केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवार, १ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. (Nirmala Sitharaman) निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या. यावेळी केंद्र सरकारने आयकर स्लॅबमध्ये कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच निर्मला सीतारामन (Interim Budget 2024) यांनी आपल्या भाषणात सांगितले की, त्यांचे सरकार वंदे भारत ट्रेनच्या बोगीप्रमाणे ४० हजार रेल्वे बोगी बनवेल. त्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात इतर अनेक मोठ्या योजनांचाही उल्लेख केला.
(हेही वाचा – BMC Budget 2024 – 25 : मुंबई महापालिकेचा यंदा ५९,९५४.७५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प)
तर दुसरीकडे या अर्थसंकल्पामध्ये (Interim Budget 2024) लक्षद्वीपबाबत मोठी घोषणा करण्यात आली. तसेच मालदीवला देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत मोठी कपात करण्यात आली.
Interim #Budget2024 proposes a 22% cut in aid to the Maldives, allocating Rs 600 crore for developmental assistance. This comes amid a diplomatic row and a 10% overall reduction in aid to foreign nations.
— Saveitwisely (@saveitwisely) February 1, 2024
भारत सरकारने २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात (Interim Budget 2024) मालदीवला दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत २२ टक्के कपात करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. भारत सरकारने मालदीवच्या विकासकामांसाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मालदीवला कोणत्याही सरकारने दिलेल्या आर्थिक मदतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. खरेतर, २०२३-२४ मध्ये भारताने मालदीवला ७७०.९० कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली. हे २०२२ – २३ मध्ये मालदीवला दिलेल्या १८३.१६ कोटी रुपयांपेक्षा ३०० टक्क्यांनी जास्त आहे.
(हेही वाचा – Gyanvapi Case : ज्ञानवापी परिसराला आले लष्करी छावणीचे स्वरुप; मुस्लिम पक्षाकडून ‘बंद’ची हाक)
भारत सरकारने केवळ मालदीवच नाही तर इतर अनेक देशांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये (Interim Budget 2024) देखील १० टक्क्यांनी कपात केली आहे.
लक्षवेधी बाब म्हणजे, पर्यटनाला चालना देण्यासाठी लक्षद्वीपमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल, असे सीतारामन यांनी अर्थसंकल्प वाचताना नमूद केले. (Interim Budget 2024)
हेही पहा –