Gyanwapi Case : ज्ञानवापी संकुलात पूजा होणारच; मुसलमान पक्षाला न्यायालयाकडून दिलासा नाही

367
Gyanwapi Case : ज्ञानवापी संकुलात पूजा होणारच; मुसलमान पक्षाला न्यायालयाकडून दिलासा नाही
Gyanwapi Case : ज्ञानवापी संकुलात पूजा होणारच; मुसलमान पक्षाला न्यायालयाकडून दिलासा नाही

वाराणसी न्यायालयाच्या (Court of Varanasi) आदेशानंतर ज्ञानवापी संकुलाच्या व्यास तळघरात 30 वर्षांनंतर पूजा होत आहे. ‘हर हर महादेव’च्या घोषणा शंख आणि घंटानाद चालू होता. दुसऱ्या दिवशीही भाविकांनी मोठ्या संख्येने मंदिरात गर्दी केली होती. दुसरीकडे ज्ञानवापीच्या (Gyanwapi Case) व्यास तळघरातील पूजेविरोधात मुस्लिम पक्षाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

(हेही वाचा – BMC Budget 2024 – 25 : मुंबई महापालिकेचा यंदा ५९,९५४.७५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प)

अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण

वाराणसीमध्ये पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. बुधवारी न्यायालयाच्या आदेशानंतर गुरुवारी भाविकांनी मंदिरात दर्शन घेण्यास सुरुवात केली आणि शुक्रवारी सकाळपासून भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. ज्ञानवापी प्रकरणातील मुस्लिम बाजूच्या याचिकेवरील आजची सुनावणी अलाहाबाद उच्च न्यायालयात पूर्ण झाली आहे. मशिदीच्या समितीला कोणताही दिलासा मिळालेला नाही. मशीद समितीच्या याचिकेत व्यास तळघरातील पूजेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. (gyanvapi)

अलाहाबाद उच्च न्यायालयात (Allahabad High Court) ज्ञानवापी प्रकरणाची आजची सुनावणी पूर्ण झाली आहे. मशिदीच्या समितीला आज उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. ज्ञानवापी येथील तळघरात पूजा सुरू राहील. पुढील सुनावणी 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

प्रार्थनास्थळे कायदा, 1991 ला स्थगिती देण्याची मुसलमानांची मागणी

या प्रकरणाची सुनावणी अलाहाबाद उच्च न्यायालयात सुरू आहे. मशीद समिती तळघरातील (gyanvapi mosque) पूजेच्या परवानगीवर बंदी घालण्याची मागणी करत आहे. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या खंडपिठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. बुधवार, २ फेब्रुवारी रोजी वाराणसीच्या जिल्हा न्यायाधिशांनी ज्ञानवापीच्या तळघरात पूजेची परवानगी दिली होती. मशिदीच्या व्यवस्थापन समितीने या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेत प्रार्थनास्थळे कायदा, 1991 ला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.

जुम्मा नमाजच्या संदर्भात आज संपूर्ण उत्तर प्रदेशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रमुख मशिदींमध्ये नमाज पठण करताना कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या सूचना पोलीस मुख्यालयातून पोलिसांना देण्यात आल्या आहेत. (gyanvapi masjid)

(हेही वाचा – Chandrakant Patil : विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करावी)

पूजा थांबवण्याची मागणी

जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुसलमान पक्षाने अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत मंदिरातील पूजा थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. मशिदी समितीने प्रार्थनास्थळे कायदा 1991 चा हवाला देत वाराणसी न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. उच्च न्यायालय आज मशीद व्यवस्थापन समितीच्या याचिकेवर सुनावणी केली. परंतु मुसलमान पक्षाला कोणताही दिलासा दिला नाही.

मुस्लिम पक्षाने थेट सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते; मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले. वाराणसी न्यायालयाच्या निर्णयावरून राजकारण तापले आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे हिंदू पक्षात आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे मुस्लिम पक्ष याला एकतर्फी आदेश म्हणत विरोध करत आहे.

दिल्लीत बैठक

या संदर्भात दिल्लीत एक बैठक झाली. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम, MIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे (एआयएमपीएलबी, All India Muslim Personal Law Board) प्रमुख अर्शद मदनी (Arshad Madani) हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. ही बैठक सुमारे तीन तास चालली. सध्या कोणताही निर्णय झालेला नाही. मुस्लिम संघटना आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा करू शकतात, असे मानले जाते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.