Cyber Attack On Air Force: हवाई दलावर सायबर हल्ला, कॉम्प्युटर सिस्टिम हॅक करण्याचा प्रयत्न

हा हल्ला नेमका कधी झाला, हे अद्याप समजलेले नसले, तरी हवाई दलाचा डेटा सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.

276
Cyber Attack On Air Force: हवाई दलावर सायबर हल्ला, कॉम्प्युटर सिस्टिम हॅक करण्याचा प्रयत्न
Cyber Attack On Air Force: हवाई दलावर सायबर हल्ला, कॉम्प्युटर सिस्टिम हॅक करण्याचा प्रयत्न

भारतीय हवाई दलाची कॉम्प्युटर सिस्टिम हॅक (Cyber Attack On Air Force) करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मालवेअर अॅटॅक करून हवाई दलाचा डेटा चोरण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे, मात्र ही बाब वेळीच लक्षात आल्याने हवाई दलाचा महत्त्वाचा डेटा वाचला आहे. हे हॅकर्स कोण हे अद्याप समजू शकलेले नाही.

हा हल्ला नेमका कधी झाला, हे अद्याप समजलेले नसले, तरी हवाई दलाचा डेटा सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. हवाई दलाचा कोणताही डेटा चोरीला गेला नाही. मालवेअरचा हल्ला फोल ठरला. हवाई दलाकडे पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि फायरवॉल यंत्रणेमुळे डेटा चोरीला आळा बसल्याचे या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – Governor Ramesh Bais: विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत – राज्यपाल रमेश बैस )

हॅकर्सनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये १२ लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी हवाई दलाच्या आदेशाचा वापर करून रिमोट-नियंत्रित ट्रोडन हल्ला योजना आखली होती. यासाठी त्यांनी Su-30_Aircraft Procurement नावाची ZIP फाइल तयार केली होती. ती फाइल हवाई दलाच्या संगणकांवर पाठवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

कसा केला हल्ला करण्याचा प्रयत्न …

‘सायबल’ ही अमेरिकन सायबर थ्रेट इंटेलिजन्स कंपनी आहे. या कंपनीने १७ जानेवारी २०२४ ला गो स्टीलर मालवेअरचा शोध लावला होता. गुगलच्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजच्या आधारे ओपन सोर्स मालवेअरद्वारे हा हल्ला करण्यात आला होता. सायबल ही अमेरिकन सायबर थ्रेट इंटेलिजन्स कंपनी आहे. या कंपनीने १७ जानेवारी २०२४ ला गो स्टीलर मालवेअरचा शोध लावला होता. हा मालवेअर GitHub वर सहजरित्या उपलब्ध होत होता. याच मालवेअरच्या मदतीने भारताची संरक्षण यंत्रणा भेदण्याचा प्रयत्न झाला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.