तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता थलपती विजय यांनी राजकारण प्रवेशाची घोषणा केली आहे. यासोबतच विजय यानी नव्या राजकीय पक्षाचीही घोषणा केली आहे. त्यांच्या पक्षाचे नाव ‘तामिळगा वेत्री कळगम’ (टीव्हीके, Tamilaga Vetri Kazhagam) असणार आहे. सोशल मीडियात पोस्ट करून विजय यांनी स्वत: ही माहिती दिली आहे. (Tamil superstar Thalapathy Vijay)
(हेही वाचा – Bmc budget 2024 -25 education: महापालिका शिक्षण विभागासाठी यंदा केवळ १५० कोटींचाच अधिक निधी)
पक्षाच्या नावाची घोषणा करतानाच त्यानी पुढील वाटचालीचा रोडमॅपही सांगितला आहे. त्यांचा पक्ष यावर्षी होणारी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. तसेच, कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही. सर्वसाधारण आणि कार्यकारी परिषदेच्या बैठकीसाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. आगामी 2026 ची विधानसभा निवडणूक (Tamil Nadu Legislative Assembly election) हे थलपती विजय आणि त्यांच्या पक्षाचे लक्ष्य आहे. निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतर आणि लोकसभा निवडणुकीनंतर पक्ष चिन्ह, झेंडा, विचारसरणी, धोरणे, लोकांशी भेटीगाठी आणि दौऱ्यांबाबत निर्णय घेऊ.
सध्या आमच्या पक्षाने नोंदणीसाठी अर्ज केला आहे. राजकारण हा माझा छंद नाही. तर, पॅशन आहे. मी स्वतःला राजकारणासाठी पूर्णपणे समर्पित करणार असल्याचे विजय यांनी सांगितले. यापूर्वी एमजी रामचंद्रन, शिवाजी गणेशन, जयललिता, कमल हासन यांसारख्या दिग्गजांनी तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केला आहे. तामिळ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनीही पक्षाची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी माघार घेत सिनेमातच राहणे पसंत केले. दक्षिणेत कलाकारांनी यशस्वी राजकारण केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे थलपती विजय राजकारणात यशस्वी होणार का, याविषयी उत्सुकता आहे. (Tamil superstar Thalapathy Vijay)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community