Shiv Sena UBT मुळे सिद्दीकी कॉंग्रेस पक्ष सोडणार?

349
Shiv Sena UBT मुळे सिद्दीकी कॉंग्रेस पक्ष सोडणार?
Shiv Sena UBT मुळे सिद्दीकी कॉंग्रेस पक्ष सोडणार?
  • सुजित महामुलकर

कॉँग्रेस नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांच्यानंतर कॉँग्रेसला (Congress) अजून एक धक्का लवकरच बसणार असून कॉँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी (Baba Siddique) आणि त्यांचे पुत्र विद्यमान आमदार झिशान (Zeeshan Siddique) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. वांद्रे पूर्व या मतदार संघावर शिवसेना ऊबाठा दावा करणार असल्याने सिद्दीकी पिता-पुत्र पक्ष सोडणार असल्याचे सजमते. सिद्दीकी यांच्या पक्ष प्रवेशाने मुंबईत राष्ट्रवादीची संख्या वाढणार एवढे नक्की.

(हेही वाचा – Bmc budget 2024 -25 education: महापालिका शिक्षण विभागासाठी यंदा केवळ १५० कोटींचाच अधिक निधी)

बाबा अचानक सक्रिय

बाबा सिद्दीकी यांना कॉँग्रेसमधून राज्यसभा (Raya Sabha) किंवा लोकसभा (Lok Sabha) तिकीट मिळण्याची शक्यता अजिबात नाही, याची कल्पना असल्याने काही वर्षे विजनवासात असलेले बाबा अचानक सक्रिय झाले आणि पक्ष बदलून नशीब बदलण्याच्या प्रयत्नात आहेत. आज शुक्रवारी त्यांचे पुत्र वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी माध्यमांशी बोलताना “आपण अद्याप कॉँग्रेस मध्ये असल्याचे सांगून वडिलांचे काही माहीत नाही,” असे सांगून वेळ मारून नेली. मात्र येत्या १० फेब्रुवारीला वांद्रे येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात हा पक्ष प्रवेश होईल असे समजते.

नवाब मलिक अडचणीत, नवा अल्पसंख्यांक चेहेरा

माजी मंत्री आणि आमदार नवाब मलिक सध्या जामिनावर जेलबाहेर असून त्यांच्या अडचणी कमी होण्याची शक्यता निवडणुकीपर्यंत तरी दिसत नाही. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंध व मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात जामिनावर असलेले माजी मंत्री नवाब मलिक हे डिसेंबर महिन्यात नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी बाकावर जाऊन बसल्यानं राज्यातील राजकारण तापलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात अजित पवार यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी फडणवीस, भाजप आणि अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

(हेही वाचा – Finance Department : मंत्रालायातील ‘वित्त विभागा’ चा चुकीचा शासन निर्णय मागे घेण्याची नामुष्की, अधिकारी रजेवर)

बाबा सिद्दीकी राज्यसभेवर?

परिणामी राष्ट्रवादी कॉँग्रेसचा अल्पसंख्यांक चेहेरा (minority face) कमी झाला. आता बाबा यांच्या येण्याने एक अल्पसंख्यांक चेहेरा पक्षात राहील आणि पक्षाची ताकद वाढेल. यांचा फायदा पक्षाला मुंबई महापालिका निवडणुकीत निश्चित होईल, अशी चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात होताना दिसते आहे. यासाठी कदाचित राष्ट्रवादी बाबा सिद्दीकी यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अनिल परब यांची वांद्रे पूर्वतून तयारी, झिशान धोक्यात

शिवसेना ऊबाठाकडून विधान परिषदेतील आमदार अनिल परब यांनी वांद्रे पूर्व विधान सभा मतदार संघात काम सुरू केल्याने झिशान सिद्दीकी यांची चलबिचल वाढली असून राजकारणात सक्रिय राहायचे असल्यास घरात किमान एक लोकप्रतिनिधी असणे आवश्यक असते. झिशान सध्या वांद्रे पूर्वचे प्रतिनिधित्व करीत असून मिलिंद देवरा यांचा अनुभव लक्षात घेता, ऊबाठाच्या विरोधात गेल्यास कॉँग्रेस पक्षही साथ देणार नाही आणि वांद्रे पश्चिम येथून निवडून येणे आता कठीण असल्याने त्यांनी पक्ष बदलणे सोयीस्कर असल्याचे मत एका कॉँग्रेस आमदारने व्यक्त केले. (Shiv Sena UBT)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.