एच. टिप्पेरुद्रस्वामी म्हणजेच होन्नाली टिप्पेरुद्रस्वामी (Honnali Tipperudraswamy) स्वामींचा जन्म दावणगेरे जिल्ह्यातील होन्नाली येथील हिरेगोनीगेरे (Hiregonigere) गावात झाला आणि त्यांनी सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या मूळ गावी आणि तीर्थहल्ली येथे घेतले. त्यांनी १९५१ मध्ये बी.ए. ची पदवी मिळवली आणि १९५२ मध्ये म्हैसूर विद्यापीठातून (University of Mysore) कन्नडमध्ये एम.ए. केले.
त्यांनी ‘शरणारा अनुभव साहित्य’ (शिवशरण यांचे गूढ साहित्य’) हा प्रबंध सादर करून त्यांनी कर्नाटक विद्यापीठातून पीएच.डी. पदवी मिळवली. १९६४ मध्ये त्यांनी अल्मा मेटर येथे लेक्चर्स द्यायला सुरुवात केली. पुढे तर ते म्हैसूर युनिव्हर्सिटीच्या पोस्टल ऍंड करस्पॉंडेंस कोर्सेसचे संचालक म्हणून काम करू लागले. ते शिवमोग्गा जिल्ह्यातील भद्रा प्रकल्पातील विद्यापीठाच्या पदव्युत्तर केंद्राचे आणि श्री कुवेंपू कन्नड अध्यायन संस्था म्हैसूरचे संचालक होते.
(हेही वाचा – Cyber Attack On Air Force: हवाई दलावर सायबर हल्ला, कॉम्प्युटर सिस्टिम हॅक करण्याचा प्रयत्न)
त्यांनी परिपूर्णादेगे अल्लमप्रभू, कर्ताराणा कम्मता बसवेश्वरा, कादलिया कर्पुरा अक्कमहादेवी यासारख्या प्रसिद्ध संतांवर कादंबऱ्या लिहिल्या तसेच त्यांनी कादंबरीमध्ये कर्नाटकातील प्रसिद्ध राजांचा विषय हाताळला.
१९६९ मध्ये टिप्परुद्रास्वामी यांना त्यांच्या “कर्नाटक संस्कृती समीक्षे”साठी केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना १९८५ मध्ये कर्नाटक साहित्य अकादमीचा जीवनगौरव पुरस्कारदेखील मिळाला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community