Mumbai Municipal Budget: प्रत्यक्षात मांडला ५२,६१९ कोटींचा अर्थसंकल्प, दाखवले मात्र ५४,२५६ कोटींचा; महापालिकेत असे प्रथमच घडले

महसुली खर्च हा केव पगार, पेन्शन व इतर कामांवर खर्च होतो. त्यामुळे हा खर्च कमी करून विकास कामांवर अधिक होत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

870
Mumbai Municipal Budget: प्रत्यक्षात मांडला ५२,६१९ कोटींचा अर्थसंकल्प, दाखवले मात्र ५४,२५६ कोटींचा; महापालिकेत असे प्रथमच घडले
Mumbai Municipal Budget: प्रत्यक्षात मांडला ५२,६१९ कोटींचा अर्थसंकल्प, दाखवले मात्र ५४,२५६ कोटींचा; महापालिकेत असे प्रथमच घडले
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेचा (Mumbai Municipal Budget) सन २०२४-२५चा ५९,९५४.७५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय अंदाज महापालिका (Mumbai Municipal Budget) अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांना सादर केला. मात्र,अशाचप्रकारे अतिरिक्त आयुक्तांनी सन २०२३-२४चा ५२, ६१९.०७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय अंदाज पत्रक सादर केले होते. परंतु प्रत्यक्षात प्रशासकांना सादर केलेल्या रकमेऐवजी प्रशासनाने हा अर्थसंकल्पीय अंदाज ५२, ६१९.०७ कोटी रुपयांच्या तुलनेत ५४,२५६.०७ कोटी रुपये एवढा दर्शवला. यातून प्रशासनाने आता सुधारीत अर्थसंकल्पाचा ५०,०११.६० कोटी रुपये एवढा निधी दर्शवला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात मांडलेला अर्थसंकल्प आणि प्रशासन आता दाखवत असलेल्या अर्थसंकल्पातील वाढलेल्या १६४० कोटी रुपयांची नक्की गोलमाल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे प्रशासकाकडून नियमबाह्य रक्कम वाढवली गेल्याचे बोलले जात आहे.

मुंबई महापालिकेने मागील ४ फेब्रुवारी २०२३ रोजी सन २०२३-२४चा ५२,६११ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासकांना हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर चहल यांनी तो मांडला. यामध्ये मांडताना जो आकडा होता, तो आकडा सन २०२४-२५च्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या पुस्तिकेत ५४, २५६ कोटी रुपये दर्शवला आहे. या रकमेतून सुधारीत अर्थसंकल्प हा ५०, ०११ कोटी रुपये दर्शवला आहे. विशेष म्हणजे मांडलेल्या ५२, २५६ कोटी रुपयांच्य अर्थसंकल्पीय रकमेतून सुधारीत अर्थसंकल्प होणे आवश्यक असताना प्रशासनाने ५४,२५६ कोटी रुपयांमध्ये सुधारीत ५०, ०११ कोटी रुपये एवढा अर्थसंकल्पाचा आकार कमी केला आहे. मुळात जी रक्कम ऐकलीच नव्हती तीच रक्कम प्रशासनाने चालू अर्थसंकल्पात दर्शवल्याने नक्की ही रक्कम कुठे वाढली आणि कशी वाढली असा प्रश्न निर्माण झाला आहे.

(हेही वाचा – Tamil superstar Thalapathy Vijay : तमिलगा वेत्री कळघम; तमिळ सुपरस्टार थलापथी विजयने स्थापन केला स्वतंत्र राजकीय पक्ष )

आतापर्यंत महापालिकेने स्थायी समितीत व महापालिकेत जेवढे अर्थसंकल्प मंजूर केले आहेत, ते मांडलेल्या रकमेसह आहेत. म्हणजे जेवढी रक्कम त्यात नमुद असेल तेवढी असे. स्थायी समिती व महापालिकेच्या अधिकारात ५०० किंवा ७०० कोटी रुपयांच्या कामांची तरतुद करायची असल्यास अंतर्गत निधीतूनच केली जाते. अर्थसंकल्पाची रक्कम कुठेही वाढवली जात नाही. अंतर्गत निधी वळता करून इतर विकासकामांचा निधी कमी जास्त करून त्यांना आपल्या कामांचा समावेश करण्यास मुभा दिली जाते, परंतु आजवर जे घडले नाही ते प्रशासकांच्या काळात घडले असून मांडलेल्या अर्थसंकल्पाच्या रकमेपक्षा १६०० कोटी रुपयांचा अधिकचा निधी दर्शवण्यात आला आहे.

आजवर नगरसेवकांना अशाप्रकारे मांडलेल्या अर्थसंकल्पातील निधी वाढवता येत नाही असे सांगणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ही रक्कम कशी वाढवली असा प्रश्न उपस्थित होत आहे. आजवर मांडलेल्या रकमेतून सुधारीत अर्थसंकल्पाचा आकडा दर्शवला जातो, परंतु चहल यांनी न दर्शवलेल्या रकमेतून सुधारीत आकडा जाहीर केल्याने हा निधी आमदार व खासदार यांच्यासाठी वाढला गेला आहे का असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

(हेही वाचा – Shiv Sena UBT मुळे सिद्दीकी कॉंग्रेस पक्ष सोडणार?)

मुंबई महापालिकेने सन २०२४-२५ या वर्षांकरता मांडलेल्या ५९,९५४ कोटी रुपयांच्या आणि ५८ कोटी रुपयांच्या शिलकीच्या अर्थसंकल्पात ३१,७७४ कोटी रुपये भांडवली कामांसाठी तर २८, १२१ कोटी रुपये महसुली कामांसाठी खर्च दर्शवला आहे. मात्र, यंदा भांडवली खर्च ५३ टक्के आणि महसुली खर्च ४७ टक्के खर्च होत असल्याचे सांगत चहल यांनी भांडवली खर्चाचा अधिक वापर हा पायाभूत सेवा सुविधांवर होत असल्याने हा खर्च अधिक होणे आवश्यक असते. जेवढा महसुली खर्च होईल तेवढी विकास कामे अधिक होतात,असेच त्यांनी स्पष्ट केले. महसुली खर्च हा केव पगार, पेन्शन व इतर कामांवर खर्च होतो. त्यामुळे हा खर्च कमी करून विकास कामांवर अधिक होत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यामुळे सन २०१७-१८मध्ये जिथे भांडवली खर्च हा २५ टक्के होता, तो आता ५३ टक्के होत असल्याने महापालिकेचा पैसा विकास कामांवर अधिक खर्च होत असल्याचे दिसून येत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.