ऋजुता लुकतुके
डेव्हिस चषकाच्या (Davis Cup Tie) जागतिक गटात भारताचा (Ind vs Pak Davis Cup Tie) मुकाबला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी आणि तो ही पाकिस्तानातील इस्लामाबाद शहरात होणार आहे. तब्बल ६० वर्षांनंतर भारतीय टेनिस संघ पाकिस्तानचा दौरा करत आहे. पण, कडक सुरक्षा बंदोबस्तामुळे खेळाडूंच्या सराव आणि राहण्याच्या ठिकाणाला छावणीचं स्वरुप आलं आहे. शिवाय भारतीय खेळाडूंना या दोन ठिकाणांऐवजी दुसरीकडे कुठे फिरण्याची मुभाही नाहीए.
(हेही वाचा – US Airstrikes in Syria : इराक – सीरियामध्ये रात्री उशिरा अमेरिकेची कारवाई; ८५ ठिकाणी हवाई हल्ले)
भारतीय संघ वाघा सीमेमार्गे पाकिस्तानमध्ये पोहोचला त्याला पाच दिवस झाले. पण, अजून भारतीय संघ बाहेर कुठेही फिरू शकलेला नाही. त्यांना तशी परवनगीच नाही. बुधवारी भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी मात्र टेनिस संघाला आमंत्रित केलं होतं. आणि तिथेही भारतीय संघ गेला तो कडेकोट बंदोबस्तातच. (Ind vs Pak Davis Cup Tie)
सतत सुरक्षारक्षकांचा गराडा ही एक गोष्ट सोडली तर भारतीय संघ आपल्या पारंपरिक शेजारी देशात आनंदात वेळ घालवतोय. ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान उभय देशांमध्ये डेव्हिस चषकाचा सामना रंगणार आहे. आणि भारताचे ज्येष्ठ खेळाडू यात खेळणार नसले तरी भारताचंच पारडं जड मानलं जातंय. डेव्हिस चषकात आतापर्यंत उभय देशांमध्ये झालेल्या लढतीत सातही लढतीत भारताने बाजी मारली आहे.(Ind vs Pak Davis Cup Tie)
(हेही वाचा – Rani Baug Flower Show : दहा हजार कुंड्यांमधील विविधरंगी फुलांनी वेधले मुंबईकरांचे लक्ष)
रोहन बोपान्ना सारख्या ज्येष्ठ खेळाडूंनी या सामन्यातून सुरक्षेच्या कारणास्तव माघार घेतली आहे. त्यामुळे भारतासाठी एकेरीचे सामने खेळतील रामकुमार रामनाथन आणि श्री बालाजी. बालाजी एरवी दुहेरीत खेळतो. पण, इस्लामाबादच्या टेनिस कोर्टावर चेंडू खाली राहतो. आणि दुसरा एकेरीतील खेळाडू निकी पोंचा उंच आहे. त्यामुळे त्याला चेंडू परतवण्यासाठी सतत वाकावं लागू शकतं. यामुळेच भारताने बालाजीचा पर्यात एकेरीसाठीही निवडला आहे. बालाजी अलीकडेच न्यूपोर्ट इथं झालेल्या एटीपी २५० स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचला होता. त्यामुळे अजूनही तो एकेरीत खेळू शकतो असा विश्वास संघाचे प्रशिक्षक झिशान अली यांना आहे.(Ind vs Pak Davis Cup Tie)
Davis Cup Battle Alert!🇮🇳🎾
In the opening rubber, witness the clash between Ramkumar Ramanathan and Aisam Ul Haq Qureshi. The 2nd rubber intensifies as Sriram Balaji takes on Aqeel Khan.
Day 2 will serve the doubles drama.
Let the rubber meet the road! 💙🔥@DavisCup #IndvPak pic.twitter.com/hgxxcYao8z— All India Tennis Association (@AITA__Tennis) February 2, 2024
रामनाथन आणि बालाजी यांचा मुकाबला आहे तो पाकिस्तानचे स्टार खेळाडू ऐसाम उल हक कुरेशी आणि अकील अली यांच्याशी. दोघांकडे अनुभव असला तरी ते आता चाळीशीत पोहोचले आहेत. त्यामुळे भारताला दुबळ्या संघासह खेळतानाही चांगली संधी असल्याचं बोललं जात आहे.
दुहेरीत साकेत मायनेनी आणि युकी भांबरी ही भारतीय जोडी खेळणार आहे. सुरुवातीला भारतीय खेळाडूंनी आणि भारतीय फेडरेशनने पाकिस्तानमध्ये खेळण्याला नकार दिला होता. सामना त्रयस्थ जागी खेळवण्याची विनंती आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनला केली होती. पण, ती फेटाळली गेल्यावर पाकिस्तानमध्ये खेळण्याची तयारी असलेले खेळाडू घेऊन भारतीय संघ पाकिस्तानला आला आहे. आणि या सामन्यावर आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनचंही लक्ष आहे. मैदानात फक्त १५० निमंत्रित प्रेक्षक आणण्याची परवानगी टेनिस फेडरेशनने पाकिस्तानला दिली आहे. तर या सामन्याची जाहिरात करण्यासही पाकिस्तानला मनाई करण्यात आली आहे.(Ind vs Pak Davis Cup Tie)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community