UlhasNagar Crime : शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार; भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक

उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या कॅबिनमध्ये शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड, त्यांचे साथीदार राहुल पाटील आणि भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्यामध्ये एका विषयावरून सुरुवातीला बाचाबाची झाली.

308
UlhasNagar Crime : शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार; भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक

भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना (शिंदे गट) कल्याण पूर्व (UlhasNagar Crime) शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. यात महेश गायकवाड आणि त्यांचे साथीदार राहुल पाटील गंभीर जखमी झाले. महेश गायकवाड यांना लागलेल्या गोळ्या काढण्यात आल्या असून अधिक उपचारासाठी त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, आमदार गणपत गायकवाड (UlhasNagar Crime) यांच्या सुरक्षरक्षकाने गोळीबार केल्याचे बोलले जात असून गायकवाड व सुरक्षारक्षक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उल्हासनगर हिललाईन पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे आणि संदीप सर्वांकर यांना अटक केली आहे. या प्रकरणात आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव आणि इतर दोन जण फरार आहेत. सध्या पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

(हेही वाचा – LK Advani Bharat Ratna : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर)

नेमकं प्रकरण काय?

उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या कॅबिनमध्ये शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड, त्यांचे साथीदार राहुल पाटील आणि भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्यामध्ये एका विषयावरून सुरुवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर शिवीगाळ व गोळीबार झाला. यामध्ये महेश गायकवाड यांना चार, तर राहुल पाटील यांना दोन गोळ्या लागल्या. हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांच्या केबिनमध्ये शुक्रवारी रात्री अंदाजे ११ वाजता गोळीबार झाला असून यापूर्वीही महेश गायकवाड व आमदार गणपत गायकवाड यांच्यात हाणामारी झाल्याचे प्रकार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. (UlhasNagar Crime)

होय, मीच गोळीबार केला – गणपत गायकवाड

हा सर्व प्रकार ५० गुंठे जमिनीच्या वादातून (UlhasNagar Crime) घडल्याची माहिती मिळत आहे. अधिक माहिती अशी की, उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या केबिनमध्येच गोळी झाडल्याची ही घटना घडली आहे. अशातच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी याप्रकरणी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली बाजू सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गणपत गायकवाड यांनी होय, मीच गोळीबार केला, असं म्हणत गोळीबार केल्याचं मान्य केलं आहे. पोलीस ठाण्याच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आली. या लोकांनी माझ्या जागेवर जबरदस्तीने कब्जा केला होता. या सर्व गोष्टीचा मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केल्याचं गणपत गायकवाड यांनी कबूल केलं. माझ्या मुलांना पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांसमोर मारहाण होत होती. त्यामुळे माझ्यासमोर पर्याय नव्हता. पोलिसांसमोर माझ्यावर जर कुणी हल्ला करत असेल, तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी असं करणं गरजेचं होतं. माझा मनस्ताप झाला, म्हणून मी फायरिंग केली. मी स्वत: पोलिसांसमोरच गोळी झाडली. मला याचा पश्चाताप नाही. कारण माझ्या मुलांना जर ते पोलिसांच्या समोर मारत असतील, तर मग मी काय करणार. पोलिसांनी मला पकडलं. त्यामुळेच तो वाचला. मी त्यांना जीवे मारणार नव्हतो. पण पोलिसांच्या समोर जर असं कोणी करत असेल, तर आत्मसंरक्षणासाठी हे करणं गरजेचं आहे. असेही गायकवाड यांनी सांगितले. (UlhasNagar Crime)

(हेही वाचा – Ind vs Pak Davis Cup Tie : कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पार पडणार भारत – पाक डेव्हिस चषक सामना)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही केले गंभीर आरोप –

दरम्यान आमदार गणपत गायकवाड (UlhasNagar Crime) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे यांनी असेच गुन्हेगार राज्यभरात पाळून ठेवले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचं काम करत आहेत. ते मुख्यमंत्री असले तर राज्यात केवळ गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवलं आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसेच मी मला होत असलेल्या त्रासाबाबत भाजपामधील वरिष्ठांना कल्पना दिली होती. ही लोकं माझा वारंवार अपमान करतात. मी केलेल्या कामांच्या ठिकाणी श्रीकांत शिंदेंच्या नावाचा फलक लावला जातो, असेही आमदार गायकवाड म्हणाले. (UlhasNagar Crime)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.