रामललाच्या (Ramlalla Darshan) प्राणप्रतिष्ठापनेनंतर लाखोंच्या संख्येने भक्त अयोध्येतील राम मंदिरात जात आहेत. दर्शनाकरिता आलेल्या या भक्तांना सहज आणि सुलभरित्या दर्शन घेता यावे याकरिता मंदिर ट्रस्ट आणि प्रशासनाकडून महत्त्वाची उपाययोजना करण्यात आली आहे. यामुळे आता मंदिरात आलेल्या भक्तांना रामललाचे दर्शन घेणे सोपे होणार आहे.
मंदिरात आलेल्या भक्तांना रामललाचे दर्शन घेताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मंदिर ट्रस्ट आणि प्रशासनाचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. 23 जानेवारीला मंदिर दर्शनासाठी सर्वांकरिता खुले झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 5 लाख भक्तांनी प्रभु श्री रामाचे दर्शन घेतले.
यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम जन्मभूमी मंदिरात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दर्शन-पूजन करण्याबाबत मास्टर प्लान तयार केला. त्यानंतर राम मंदिर ट्रस्ट आणि योगी सरकारने दर्शन मार्गावर एक फास्ट ट्रॅक लाईन तयार केली आहे.
– जर तुम्ही प्रभु श्रीरामाच्या दर्शनाकरिता जात असाल, त्यावेळी तुमच्याकडे कोणतीही इलेक्ट्रिक वस्तू नसेल, तर तुम्हाला रामललाचे दर्शन सहजरित्या होऊ शकते.
– जलद मार्गाने (फास्ट ट्रॅक) रामजन्मभूमी संकुलात प्रवेश दिला जाईल. यामुळे रामजन्मभूमी संकुलात थेट चेकिंग पॉइंटवरून प्रवेश करता येणार आहे. यामुळे रामललाचे दर्शन जलद होईल, पण २० ते २५ मिनिटांचा वेळही वाचेल.
(हेही वाचा – Lewis Hamilton to Ferrari : फॉर्म्युला वन चॅम्पियन लुईस हॅमिल्टन मर्सिडिज सोडून फेरारीकडे का गेला?)
या वस्तूंवर बंदी
अयोध्येचे आयजी प्रवीण कुमार म्हणाले की, राम जन्मभूमी परिसरात भाविकांच्या सोयीसाठी फास्ट ट्रॅक लाइन तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये सामान आणि बुटांशिवाय येणाऱ्या भाविकांचा 20 ते 25 मिनिटांचा वेळ वाचून त्यांना थेट राम जन्मभूमी संकुलात जाता येईल. फास्ट ट्रॅकद्वारे भाविकांना तपासणी केंद्रावर नेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. तेथून ते थेट राम जन्मभूमी परिसरात पोहोचतील. भगवान राम लल्लाच्या मंदिरात दर्शनासाठीच्या वस्तूंसह मोबाईल फोन, घड्याळे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पान, बिडी, गुटखा आणि तंबाखू यासारख्या काही वस्तूंवर तसेच औषधांवर बंदी आहे. प्रत्येक व्यक्ती केवळ पैसे घेऊनच राम जन्मभूमी परिसरात जाऊ शकते.
भाविकांचा वेळ वाचण्याकरिता…
राम मंदिर ट्रस्टच्या या सुविधेसह अयोध्येत येणारे राम भक्तही उत्साही आहेत. राम मंदिर ट्रस्ट आणि प्रशासनाने भक्तांना रामललाचे लवकर दर्शन व्हावे, यासाठी केलेल्या व्यवस्थेसाठी कौतुक होत आहे. समाजातील काही संतही नव्या व्यवस्थेचे कौतुक करत आहेत. जलद मार्गामुळे भाविकांचा वेळ वाचतो. यासह भगवान रामाची पूजादेखील सहजपणे केली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community