उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात शुक्रवारी २ फेब्रुवारी रोजी रात्री भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad Firing) यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. उल्हासनगर गोळीबार सारख्या (Ganpat Gaikwad Firing) प्रकरणावरून सत्तेचा गैरवापर होत असल्याचे पवार म्हणाले.
सत्तेचा गैरवापर केला जातो, अशी तक्रार नेहमी होत असते. गोळीबार (Ganpat Gaikwad Firing) आणि तत्सम गोष्टी व्हायला लागल्या आणि राज्य सरकारने याबाबतीत बघ्याची भूमिका घेतली असेल तर राज्य कोणत्या दिशेने चालले आहे, हे कळते. महाराष्ट्राच्यादृष्टीने अशा घटना चिंताजनक आहेत, असेही शरद पवार म्हणाले.
(हेही वाचा LK Advani Bharat Ratna : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर)
नितीश कुमारांचा निर्णय चुकीचा
इंडिया आघाडीतून नितीश कुमार बाहेर पडले आहेत. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, नितीश कुमार यांनी एनडीएत जायचा निर्णय घेतला. पण खरे सांगायचे तर इंडिया आघाडीची स्थापना करण्यात त्यांनीच पुढाकार घेतला होता. पण त्यांनी अचानक टोकाचा निर्णय का घेतला, याबद्दल काही सांगू शकत नाही. पण जे घडले, ते चांगले नाही झाले. पण बिहारमधील जनतेला त्यांचा हा निर्णय रुचलेला नाही. याचे परिणाम बिहारच्या निवडणुकीत दिसतील, असेही शरद पवार म्हणाले.
पंतप्रधानांच्या दौऱ्यावर काय म्हणाले?
पंतप्रधान मोदी यांचे महाराष्ट्रात दौरे वाढत आहेत, ही चांगली बाब आहे. पण जसे ते गुजरातमध्ये गेल्यावर काहीतरी देण्याचे औदार्य दाखवत असतात तसे त्यांनी महाराष्ट्रात आल्यावर काहीतरी देण्याची घोषणा करावी, मला त्याचा आनंद होईल, असेही शरद पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community