- ऋजुता लुकतुके
सौदी अरेबियातील अल नासर संघ विरुद्ध अमेरिकेतील इंटर मियामी संघ अशा मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात अल नासर संघाने इंटर मायामीचा ६-० असा धुव्वा उडवला. विशेष म्हणजे मायामीकडून या सामन्यात लुई सॉरेस, सर्जिओ बस्केट आणि जॉर्डी एल्बा हे स्टार खेळाडू खेळले. तर लायनेल मेस्सीही (Lionel Messi) शेवटची काही मिनिटं मैदानावर होता. उलट अल नासर संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) मात्र पोटरीच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. असं असताना कागदावर मजबूत असलेला मायामीचा संघ हरला. मेस्सीला आपल्या संघाचा धुव्वा उडताना पहावं लागलं. (Messi vs Ronaldo)
सौदी क्लब अल नासरचा संघ सुरुवातीपासूनच आक्रमक मूडमध्ये होता. आणि रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) गैरहजेरीत ब्राझीलच्या टलिस्काने खेळाची सूत्र आपल्यात हातात घेतली. पहिल्या १२ मिनिटांतच ३ गोल करत त्याने अल नासरला ३-० अशी आघडी मिळवून दिली. या गोलनंतर मेस्सीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. (Messi vs Ronaldo)
Messi at full time pic.twitter.com/zvsmiuJqir
— Messi Media (@LeoMessiMedia) February 1, 2024
(हेही वाचा – Ramlalla Darshan: आता रामललाचे दर्शन घेणे झाले सोपे…ट्रस्ट आणि प्रशासनाकडून महत्त्वाची उपाययोजना, जाणून घ्या)
मायामी संघाचा बचावही दुबळा होता. आणि सुरुवातीपासून चेंडूचा ताबा आपल्याकडे राखण्यात त्यांना अपयश आलं. टलिस्काच्या हॅट-ट्रीक व्यतिरिक्त एलिरिक लापोर्तेनं फ्री-किकवर लांबून केलेला गोलही अप्रतिम होता. हाच सामन्यातील सर्वोत्तम गोल ठरावा. मोहम्मद मारन या सौदी खेळाडूनेही एक गोल केला. (Messi vs Ronaldo)
Puskas award 🏅
Goal of the year already🎖️
“Aymeric Laporte ” 👑#InterMiami #AlNassr#Ronaldo #Messi #Goal pic.twitter.com/XFW1DJwd5p— Mehran Sofi (@sadistic3232) February 1, 2024
मेस्सी फक्त शेवटची ७ मिनिटं मैदानावर होता. इंटर मायामी संघ सौदी अरेबियाच्या दौऱ्यानंतर आता आशियात हाँग काँग आणि जपानचा दौरा करणार आहे. २१ फेब्रुवारीला अमेरिकेत मेजर सॉकर लीग सुरू होत आहे. त्यापूर्वी अमेरिकन क्लबचे खेळाडू एकत्र यावे यासाठी संघाचा हा दौरा आखण्यात आला आहे. (Messi vs Ronaldo)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community