राज्यसभेच्या खासदारकीसाठी Chhatrapati Shahu Maharaj यांच्या नावावरून संजय राऊत का होतायेत ट्रोल?
महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२४ ला संपत असल्याने त्या जागा रिक्त होत आहेत. यासह अन्य राज्यांतील राज्यसभेच्या एकूण ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे.
शिवसेना ऊबाठा (Shivsena UBT) गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यसभेवर एक तरी खासदार निवडून येईल इतकी मते पक्षाकडे नसताना, शनिवार, ३ फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा विचार करायला हवा, असे मत समाजमाध्यमांवर व्यक्त केले. त्यानंतर मात्र नेटकऱ्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केले. गेल्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळी पाठींबा मिळवण्यासाठी छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांना ‘शिवबंधन’ बांधून घेण्याची अट टाकून अपमान केल्याची आठवण अनेकांनी संजय राऊतांना करून दिली.
राज्यसभा बिनविरोध?
राऊत यांनी ‘X’ वर मत मांडताना म्हटले की, “राज्यसभा बिनविरोध होणार? सहाव्या जागेसाठी सगळ्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांचा विचार करायला हवा! शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस मिळून ३० मते वेगळी आहेत.. इतरही येतील.” तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार सुप्रिया सुळे यांना टॅग केले.
पहिल्याच जागेसाठी का नाही?
वंशज असल्याचे पुरावे भेटले का उद्धव गटाला??? शिवबंधन बसण्यासाठी मातोश्री वर येण्याची अट शिथील केली का ?
यावर पहिली प्रतिक्रिया व्यक्त झाली ती अशी: ‘पहिल्याच जागेसाठी का नाही? शेवटचा पर्याय का?’ तर पुढे ‘हे तेच ना ज्यांनी गेल्या वेळेला हीच मागणी केली, तेव्हा अपमान करून पाठवले होते. शिवबंधन बांधा म्हणणारे तुम्हीच ना?’ असा सवाल केला.
छत्रपती वंशजांचे नाव घेऊन चाल खेळू नका..
तर एकाने ‘का म्हणून बिनविरोध? असा प्रश्न करत, ‘तुमच्याकडे एक उमेदवार निवडून आणता येईल इतकी मते आहेत तर आणा शाहू महाराजांना निवडून.. उगाच छत्रपती वंशजांचे नाव पुढे करून चाल खेळू नका.. मागच्यावेळी छत्रपतींचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न केला आणि आता फार प्रेम उफाळून आले तुमचं???’ असा टोला हाणला.
ऊबाठाला सातवा उमेदवार कर..
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांना पुरावे मागणारे तुम्ही लोक निवडणूक आली की त्यांच्या नावावर मत मागत आहेत लाज वाटली पाहिजे आपणांस
एकाने तर थेट उद्धव ठाकरे यांना सातवा उमेदवार करण्याची सूचना मांडली. ‘अरे ऊबाठाला सातवा उमेदवार कर, सगळी मराठी मतं त्यालाच मिळून तो निवडून येईल, मग पंतप्रधानपद नक्की त्यालाच मिळेल.’ अन्य एकाने: ‘उदयनराजे भोसले यांच्याकडे वंशज असल्याचे पुरावे मागणाऱ्या राऊतना आज छत्रपती (Chhatrapati Shahu Maharaj) फार प्रिय झाले.. तुमच्याकडे आवश्यक संख्याबळ आहे तर छत्रपती शाहू महाराजांना (Chhatrapati Shahu Maharaj) राज्यसभेवर पाठवा.. उगाच बिनविरोध करायची चर्चा बंद करा’ असे सुनावले.
महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२४ ला संपत असल्याने त्या जागा रिक्त होत आहेत. यासह अन्य राज्यांतील राज्यसभेच्या एकूण ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. राज्यातून शिवसेनेचे अनील देसाई (Anil Desai), भाजपचे प्रकाश जावडेकर (Prakash Jawadekar), नारायण राणे (Narayan Rane) आणि व्ही. मुरलीधरण, कॉँग्रेसचे कुमार केतकर (Kumar Ketkar) आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण या सहा खासदारांच्या जागा रिक्त होत आहेत.
मागच्या निवडणुकीत फावड्यानी तर महाराजांच्या परिवारात टिकिट देण्या साठी मातोश्रीवर येऊन शिवबंधन बांधुन घेण्याची अट लावली होती आता काय झालं…..Y….Zव्या नोटी कंपाऊंडर……???
कॉँग्रेसमधून (Congress) नुकतेच आयात झालेले मिलिंद देवरा यांचे नाव शिवसेना (शिंदे) पक्षाकडून निश्चित झाल्यासारखेच आहे तर राष्ट्रवादीकडून (NCP) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ यांचे नाव आघाडीवर आहे. २०१९ मध्ये पार्थ पवार (Parth Pawar) मावळ लोकसभा मतदार संघातून २ लाखाहून अधिक मतांनी शिवसेनेचे श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांच्याकडून परभूत झाले होते. पुन्हा लोकासभेचा धोका न पत्करता राज्यसभा तुलनात्मक सुरक्षित असल्याचे समजते. या निवडणुकीसाठी एका उमेदवाराला ४२ मतांची गरज असून शिवसेनेकडे ३९ आमदार आणि अन्य अपक्ष तर राष्ट्रवादीचे ४२ आमदार आहेत.
अहो लवंडे हाच विचार मागील वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणूकीवेळी नाही सुचला… तेव्हा युवराज संभाजीराजे हेच म्हणत होते तेव्हा मातोश्रीवर येऊन शिवबंधन बांधायची अट घालत होता.. तुम्ही स्वतःला छत्रपती यांच्या पेक्षा मोठे समजताय वाटतं
भाजपचे तीन खासदार निवृत्त होत असून बिहारचे प्रभारी विनोद तावडे (Vinod Tawde), पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि विजया राहाटकर (Vijaya Rahatkar) यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपचे सध्या १०४ आमदार संख्या असून प्रत्येकी ४२ प्रमाणे १२६ ची गरज भासेल. पंकजा यांना राज्यसभेवर पाठवून त्यांची बहीण प्रीतम यांचा विचार विधानसभा निवडणुकीसाठी करण्यात येणार असल्याचे समजते. कॉँग्रेसचे ४५ आमदार असून त्यांचा उमेदवार दिल्लीहून ठरवला जाईल, असे सांगण्यात आले. मात्र मुंबईतील माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांचे नाव चर्चेत आहे.