- ऋजुता लुकतुके
डेव्हिस चषकाच्या जागतिक गटातील स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर पहिल्या दिवशी २-० अशी आघाडी घेतली आहे. रामकुमार रामनाथनने पहिल्या सामन्यात ऐसम अल कुरेशीचा ६-७, ७-६ आणि ६-० असा पराभव केला. पहिलाच सामना रंगतदार झाला. ऐसम अल कुरेशी पाकिस्तानचा नंबर वन खेळाडू असला तरी तो आता ४३ वर्षांचा आहे. पण, ग्रासकोर्टवर खेळायला त्याला आवडतं. (Ind vs Pak Davis Cup 2024)
इथं वेगवान फटके खेळण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. आणि त्याने रामकुमार विरुद्धही तशीच वेगवान सुरूवात केली. पहिला सेट त्याने ७-६ असा जिंकलाही. दुसरा सेटही चुरशीचा झाला. आणि यावेळी रामकुमारने टायब्रेकरवर सर्व्हिसवर चांगलं नियंत्रण ठेवलं. आणि हा सेट ७-६ असा जिंकून सामन्यात बरोबरी आणली. (Ind vs Pak Davis Cup 2024)
तिसऱ्या गेममध्ये मात्र ऐसमला जुन्या दुखापतीचा त्रास झाला. आणि त्याचा प्रतिकार एकदम थांबला. त्याने मध्ये एकदा २ मिनिटांचा मेडिकल टाईम-आऊटही घेतला. या सेटमध्ये रामकुमारने सुरुवातीपासून आघाडी घेत ५-० अशी मजल मारली होती. शेवटी ऐसमची सर्व्हिस चौथ्यांदा भेदत त्याने हा सेट ६-० ने जिंकला. आणि सामनाही खिशात टाकला. (Ind vs Pak Davis Cup 2024)
Breaking News 🇵🇰 v 🇮🇳
India’s Ram Kumar Beat Pakistan’s Aisam Ul haq in Davis Cup Tie First Single Match pic.twitter.com/jaz17To4j3
— ٰImran Siddique (@imransiddique89) February 3, 2024
(हेही वाचा – Ajit Pawar: भारतरत्न पुरस्काराबद्दल ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे अजित पवारांकडून अभिनंदन)
इथे पार पडणार डेव्हिस चषकाचा सामना
दुसऱ्या सामन्यात भारताच्या श्री बालाजीने अकील ७-५ आणि ६-३ असं आरामात हरवलं. दुसऱ्या सामन्यात मात्र पावसाचा व्यत्यय आला. पण, बालाजीने खेळावरील आपलं लक्ष ढळू दिलं नाही. त्याची सर्व्हिसही जोरकस आणि भेदक होती. दोन्ही सेटमध्ये मिळून त्याने ५ बिनतोड सर्व्हिस केल्या. (Ind vs Pak Davis Cup 2024)
सामन्यात तीन वेळा त्याने अकीलची सर्व्हिस भेदली. उलट अकीलला एकदाही बालाजीची सर्व्हिस भेदण्यात यश आलं नाही. डेव्हिस चषक सामन्यात आता रविवारी दुहेरीची लढत होईल. भारताकडून साकेत मायनेनी आणि युकी भांबरी ही जोडी दुहेरीत उतरणार आहे. इस्लामाबाद इथं कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत डेव्हिस चषकाचा हा सामना पार पडत आहे. (Ind vs Pak Davis Cup 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community