मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली तपास यंत्रणा काम करीत आहे, मी गोळ्या झाडल्या परंतु माझा मुलगा वैभव हा घटनास्थळी नसताना देखील त्याला गुन्ह्यात आरोपी दाखवून अटक करण्यात आली असल्याचा आरोप हिललाईन गोळीबार प्रकरणात चोपडा न्यायालयात हजर करण्यात आलेले भाजपा आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शनिवारी (०३ फेब्रुवारी) न्यायालयात केला आहे. या प्रकरणात न्यायालयाने आमदार गणपत गायकवाडसह (Ganpat Gaikwad) ३ जणांना ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Ganpat Gaikwad Firing)
आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad), संदीप सरवणकर आणि हर्षल केणे या तीन जणांना हिललाईन पोलीस ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबार प्रकरणात शनिवारी दुपारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात उल्हासनगरच्या चोपडा न्यायालयात हजर करण्यात आले होते. (Ganpat Gaikwad Firing)
(हेही वाचा – Importance of Value Education : मूल्य शिक्षणाचे महत्व काय आहेत? ‘या’ ७ गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात)
१४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी
न्यायाधीशांनी आरोपींना तुमची काही तक्रार आहे का असे विचारले असता गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी न्यायालयात मुख्यमंत्री यांच्यावर आरोप करून तपास यंत्रणा मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करीत आहे, माझ्या मुलगा घटनेच्या ठिकाणी नसताना देखील त्याला आरोपी दाखवून त्याला अटक करण्यात आली असल्याचे गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी न्यायालयासमोर म्हटले आहे. दरम्यान न्यायालयाने सरकारी पक्षाची आणि आरोपीच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) सह तिघांना १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Ganpat Gaikwad Firing)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community