महालक्ष्मी रेसकोर्सच्या (Mahalaxmi Race Course) जागेचा भाडेकरार जून २०१३ मध्ये संपुष्टात आल्यानंतर आजही ही जागा रॉयल टर्फ क्लबच्या ताब्यात आहे. मात्र, आज यातून एकही पैसा महापालिकेला मिळत नाही. थकीत पैसे भरा त्यानंतरच पुढील भाडेकराराचा निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका महापालिकेने घेतलेली असतानाच आता महापालिकेने ही जागा आपल्या ताब्यात घेण्यासाठी सामोपचाराने प्रयत्न सुरु केले जात आहेत. त्यामुळे रेसकोर्समधील (Mahalaxmi Race Course) मोकळ्या जागेत सेंट्रल पार्क बनवून ते कोस्टल रोड प्रकल्पामध्ये उपलब्ध्ण होणाऱ्या मोकळ्या जागेला जोडले जाणार आहे. त्यामुळे तब्बल ३०० एकर जागेत हे सेंट्रल पार्क बनवले जाणार असून रेसकोर्सची आवश्यक नसलेली जागा महापालिका ताब्यात घेऊन पुन्हा एकदा त्याच कंपनीला ९७ वर्षांच्या भाडेकरार वाढवून देण्यास महापालिका प्रशासन (Municipal Administration) तयारी झाली आहे. (Mahalaxmi Race Course)
महालक्ष्मी रेसकोर्सच्या (Mahalaxmi Race Course) जागेचा भाडेकरार संपुष्टात येऊन ९ वर्षे उलटली तरी अद्यापही सरकारच्यावतीने कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे ना भाडेकराराचे नुतनीकरण केले जात ना जागा सरकार ताब्यात घेत. त्यामुळे महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल थकला गेला आहे. परंतु आता राज्याच्या नगरविकास खात्यानेच रॉयल टर्फ क्लबकडून हमीपत्र लिहून घेत शासनाच्या पुढील निर्णयापर्यंतची थकीत रक्कम वसूल करण्याच्या सूचना महापालिकेला केल्या आहेत. त्यामुळे रॉयल टर्फ क्लबने हमी पत्र दिल्यास महापालिकेला सन २०१३ पासूनची थकीत भाड्याची रक्कम वसूल करता येणार आहे. मात्र, हे प्रकरण सुरु असतानाच महापालिकेने आता दक्षिण मुंबईतील सेंट्रल पार्कसाठी रॉयल टर्फ क्लबशी समझोता करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण मुंबईत कोस्टल रोड प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या मोकळ्या जागेला जोडणारे असे रेसकोर्सवर (Mahalaxmi Race Course) गार्डन उभारले जाणार आहे. या दोन्ही गार्ड्सना जोडण्यासाठी २५ मीटचा भुयारी मार्ग बनवून याठिकाणी मुंबई सेंट्रल पार्क जनतेला उपलब्ध करून देण्याचा विचार केला जात आहे. (Mahalaxmi Race Course)
याबाबत महापालिका प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी सन २०१३ पासून रेसकोर्सची (Mahalaxmi Race Course) लिज संपलेली आहे. परंतु त्यांचे भाडेकरार न झाल्याने त्यांचे भाडे प्रलंबितच आहे. भाडेकरार न झाल्याने त्यांना कोणत्याही प्रकारच्या दुरुस्ती व अन्य कामांसाठी परवानगी दिली जात नाही. सुमारे १ लाख एकरचा परिसर असून आपल्याला गरज नसलेली जागा महापालिकेला परत करावी अशाप्रकारची सुचना त्यांनी केली. त्यानुसार त्यांनी २११ एकर जास्त असून त्यातील १२० एकर महापालिकेला द्यावी आणि ही जागा महापालिकेला दिल्यानंतर त्यांना ९७ वर्षांचा भाडेकरार वाढवून दिला जाईल असे सांगितले. ज्यामुळे रेसकोर्समधील कामे आपल्याला करता येतील आणि सेवा पुरवता येतील तसेच आपल्याकडून उपलब्ध होणारी जागा जनतेला उपलब्ध करून दिली जाईल, असे चहल यांनी स्पष्ट केले. (Mahalaxmi Race Course)
मुंबईला ३०० एकर जागेवर मोठे गार्डन उपलब्ध करून दिले जाणार
त्यामुळे कोस्टल गार्डनचे क्षेत्रफळ हे १७५ एकर एवढे असून रेसकोर्सची १२० एकरची जागा महापालिकेला हस्तांतरीत झाल्यास ३०० एकर जागेवर मुंबई सेंट्रल पार्क बनवले जाईल अणि हे मुंबईतील सर्वांत मोठे पार्क असेल. या जमिनीवर एकही विट रचली जाणार नसून विकासकाला ही जमिनी देण्याचा डाव असल्याचा जो प्रचार केला जात आहे तोही खोटा आहे, इथे कुठलाही विकासक येणार नाही. पूर्णपणे जागा आरजीची असून याठिकाणी कोणतेही बांधकाम करता येत नाही. त्यामुळे दोन्ही मोकळ्या जागांना जोडण्यासाठी ऍनी बेझंट रोडवर २५ मीटरचा भुयारी मार्ग बांधला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुंबईला ३०० एकर जागेवर मोठे गार्डन उपलब्ध करून दिले जाणार आहे. (Mahalaxmi Race Course)
कोस्टल रोडची जमिन सुप्रिम कोर्टाच्या देखरेखीखाली असून रेसकोर्सची (Mahalaxmi Race Course) जागा ताब्यात आल्यानंतरही ही जागा सुप्रिम कोर्टाच्या देखरेखीखाली आणली जाईल, असे चहल यांनी सांगून याबाबत रेसकोर्सवरील (Mahalaxmi Race Course) क्लबचाय सदस्यांच्या सर्वसाधारण बैठकीत हा मुद्दा आपण मांडल्यांनतर ७७ टक्के लोकांनी महापालिकेच्या बाजून समर्थन दर्शवले आहे. त्यामुळे १२० एकरची जागा ताब्यात आल्यानंतर त्यांच्याशी ९७ वर्षांचा भाडेकरार केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांनी ही जागा दिल्यानंतर महापालिका, सरकार आणि क्लब यांच्यात हा करार होईल. (Mahalaxmi Race Course)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community