- ऋजुता लुकतुके
विशाखापट्टणम कसोटीत पहिल्या डावात भारतीय फलंदाजांकडून पोषक खेळपट्टीवर किमान साडे चारशे धावांची अपेक्षा होती. ती पूर्ण होऊ शकली नाही. पण, पहिल्या डावातील सर्वबाद ३९६ या धावसंख्येचं रक्षण भारतीय गोलंदाजांनी पुरेपूर केलं. इंग्लंडला २५३ धावांत सर्वबाद करून भारताने पहिल्या डावात १४३ धावांची आघाडी घेतली. आणि ही आघाडी मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली ती भारताचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने. (Ind vs Eng 2nd Test)
अक्षर पटेल आणि कुलदीप यादवने इंग्लिश सलामीवीरांना बाद केल्यावर जसप्रीत बुमराहने मधली फळी अक्षरश: कापून काढली. जसप्रीतने ४६ धावांमध्ये ६ बळी घेताना कसोटीतील १५० धावांचा टप्पाही ओलांडला. सर्वांत कमी कसोटींमध्ये हा टप्पा ओलांडणारा वकार युनिस नंतरचा तो दुसरा कसोटीपटू ठरला आहे. (Ind vs Eng 2nd Test)
जसप्रीतने एका षटकात विविध प्रकारचे चेंडू टाकून इंग्लिश फलंदाजांना वारंवार बुचकाळ्यात पाडलं आणि त्याचं फळही त्याला मिळालं. त्याने टिपलेले बळी होते, जो रुट, ऑली पोप, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, टॉम हार्टली आणि जिमी अँडरसन. यापैकी ऑली पॉप आणि बेन स्टोक्सच्या तर त्याने यष्ट्याच उध्वस्त केल्या. (Ind vs Eng 2nd Test)
Timber Striker Alert 🚨
A Jasprit Bumrah special 🎯 🔥
Drop an emoji in the comments below 🔽 to describe that dismissal
Follow the match ▶️ https://t.co/X85JZGt0EV#TeamIndia | #INDvENG | @Jaspritbumrah93 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/U9mpYkYp6v
— BCCI (@BCCI) February 3, 2024
(हेही वाचा – राज्यसभेच्या खासदारकीसाठी Chhatrapati Shahu Maharaj यांच्या नावावरून संजय राऊत का होतायेत ट्रोल?)
अशा केल्या यष्ट्या उद्धस्त
ऑली पोपचा तेव्हा चांगला जम बसलेला होता. आणि तो २७ धावांवर खेळत होता. पण, बुमराचा एक अचूक आणि वेगवान चेंडू त्याचा ऑफस्टंप पार उखडून गेल्या. या चेंडूनंतर पोप फक्त हताशपणे यष्ट्यांकडे बघत बसला. षटकातील इतर चेंडू अचूक पण, १३५ ते १३७ किमी ताशी वेगाने येत असताना हा यॉर्कर मात्र झपकन १४० किमी वेगाने आला. आणि पोपने बॅट खाली घेण्याच्या आतच यष्ट्या उखडून गेला. (Ind vs Eng 2nd Test)
तीच वेळ काही काळानंतर कर्णधार बेन स्टोक्सवर आली. इंग्लंडचे ७ गडी बाद झाल्यावर स्टोक्सने आक्रमक पवित्रा घेतला होता. आणि कुलदीप तसंच अश्विनला पुढे सरसावून तो खेळत होता. त्याचवेळी रोहितने चेंडू बुमराहच्या हातात दिला. आणि पहिल्याच षटकात बुमराहने अचूक टाकलेला चेंडू स्टोक्सच्या यष्ट्या उखडून गेला. पोप सारखीच स्टोक्सचीही प्रतिक्रिया होती. त्याने निराशेनं हातातील बॅटही खाली टाकून दिली. बुमराहनेच इंग्लंडचा शेवटचा गडी बाद केला आणि भारताला १४३ धावांची आघाडी मिळवून दिली. यशस्वी जयसवालच्या २०० धावांइतकंच जसप्रीतच्या ६ बळींचंही मूल्य मोठं आहे. (Ind vs Eng 2nd Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community