वर्ष २०२० मध्ये झालेल्या हिंदूविरोधी दंगलीच्या प्रकरणी (Delhi Riots) दिल्ली न्यायालयाने ३१ जानेवारी २०२४ रोजी नूर महंमद उर्फ नूरा आणि नबी महंमद या दोघांना दोषी ठरवून ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावतांना न्यायालयाने सांगितले की, आरोपी द्वेष आणि लालसेने प्रेरित होते.
नूर महंमद आणि नबी महंमद यांना (Delhi Riots) विविध दुकानांची तोडफोड करणे आणि आग लावणे या प्रकरणात सहभागी असल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या दोघांनी काही लोकांना लुटले होते आणि कलम १४४ चे (जमावबंदीचे) उल्लंघनही केले होते. न्यायालयाने निकालात म्हटले आहे की, नूर महंमद याने (Delhi Riots) दंगल घडवून आणली आणि दिलीप नामक व्यक्तीच्या दुकानाची तोडफोड केली आणि नंतर त्याला आग लावली. या वेळी त्याने दुकानातील मोबाईलही पळवले. त्याने दुकानातील मालाचेही नुकसान केले. या वेळी ‘अशोक फोम आणि फर्निचर’ नावाच्या दुकानाचीही तोडफोड आणि जाळपोळ केली होती. तसेच रामदत्त पांडे, मनोज नेगी, सोनू शर्मा, पप्पू आणि अशोक कुमार यांच्या मोटारसायकली पेटवून देण्यात आल्या.
Join Our WhatsApp Community