World Cancer Day : जागतिक कर्करोग दिन का साजरा केला जातो?

डब्ल्यूएचओनुसार कर्करोगाच्या बाबतीत ४० टक्के मृत्यू टाळता येण्यासारखे असतात. कर्करोग प्रतिबंधाविषयी जागरूकता वाढवणे हे जगभरातील अनेक कर्करोग आणि आरोग्य संस्थांचे प्रमुख उद्दिष्ट बनले आहे.

427
World Cancer Day : जागतिक कर्करोग दिन का साजरा केला जातो?

कर्करोग हा आजार पसरत चालला आहे आणि काही लोक त्यावर विजय मिळवतात तर काही लोक मृत्यूला कवटाळतात. म्हणून कर्करोगासारख्या (World Cancer Day) धोकादायक आणि प्राणघातक आजाराचे निदान आणि प्रतिबंध करण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी दरवर्षी ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. २००८ मध्ये लिहिलेल्या या जागतिक कर्करोग दिन साजरा करण्याच्या घोषणेचे समर्थन इयुनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल [UICC] ने केले. मात्र १९३३ मध्ये, आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटनेने जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे प्रथमच जागतिक कर्करोग दिन साजरा केला.

(हेही वाचा – Southern Chile Fire : चिलीच्या जंगलात लागलेल्या आगीत १९ जणांचा मृत्यू, ११०० घरे जळून खाक)

जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यामागचा प्राथमिक उद्देश काय ?

कर्करोगाविषयी (World Cancer Day) जागरुकता निर्माण करण्यासाठी, लोकांना शिक्षित करण्यासाठी, जगभरातील सरकारे आणि व्यक्तींना या आजाराविरुद्ध लढण्यास प्रवृत्त करण्यासाठी आणि दरवर्षी लाखो लोकांना मृत्यूच्या दारात जाण्यापासून वाचवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. कर्करोगाने ग्रस्त लोकांची संख्या कमी करणे आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे हा जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यामागचा प्राथमिक उद्देश आहे.

(हेही वाचा – Ganpat Gaikwad Firing : मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली तपास यंत्रणा काम करीत आहे; आमदार गणपत गायकवाड यांचा थेट न्यायालयात आरोप)

कर्करोग प्रतिबंधाविषयी जागरूकता वाढवणे –

डब्ल्यूएचओनुसार कर्करोगाच्या (World Cancer Day) बाबतीत ४० टक्के मृत्यू टाळता येण्यासारखे असतात. कर्करोग प्रतिबंधाविषयी जागरूकता वाढवणे हे जगभरातील अनेक कर्करोग आणि आरोग्य संस्थांचे प्रमुख उद्दिष्ट बनले आहे. या ध्येयाच्या महत्त्वात्वांना बढावा देण्यासाठी दरवर्षी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. आपल्या भारत देशातही कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या जातात. भारत देशाचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी अशी घोषण केली होती की, “कर्करोग जनजागृती दिन दरवर्षी ७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय स्तरावर साजरा केला जाईल. आपण या प्राणघातक आजाराला संपवण्याची मोहीम सुरू करूया.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.