पंडित भीमसेन जोशी (Pandit Bhimsen Joshi) हे शास्त्रीय संगीतातल्या भारतीय संगीत शैलीतील गायकांपैकी प्रमुख गायक होते. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९२२ साली कर्नाटकातील गडग येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गुरुराज जोशी असे होते. ते गडग येथील स्थानिक शाळेत मुख्याध्यापक होते तसेच ते कन्नड, इंग्रजी आणि संस्कृत भाषेचे विद्वान होते. पंडित भीमसेन जोशींच्या आईचे नाव गोदावरी देवी असे होते. त्या एक गृहिणी होत्या. त्यांना सोळा भावंडे होती. त्यांपैकी ते सगळ्यात मोठे होते. ते लहान असतानाच त्यांच्या आईंना देवाज्ञा आली. मग त्यांचे पालन त्यांच्या सावत्र आईने केले.
पंडितजींना लहानपणापासूनच संगीताची खूप आवड होती. संगीतातील किराणा घराण्याचे संस्थापक अब्दुल करीम खान यांचा पुष्कळ प्रभाव पंडित भीमसेन जोशी यांच्यावर होता. १९३३ साली चांगल्या शास्त्रीय संगीत गुरुंच्या शोधत ते घरातून बाहेर पडले. पुढे दोन वर्षांपर्यंत ते भारतातल्या बीजापूर, पुणे आणि ग्वालियर या शहरांमध्ये राहिले. त्यांनी ग्वालियरचे ‘उस्ताद हाफिज अली खान’ यांच्याकडूनही शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले; पण त्यांनी शास्त्रीय संगीतातले सुरुवातीचे प्रशिक्षण अब्दुल करीम खान यांचे शिष्य ‘पंडित रामभाऊ कुंदगोळकर’ यांच्याकडून घेतले होते.
(हेही वाचा – Madhav Khadilkar: नाट्य प्रयोग पूर्ण करणे हीच वडिलांसाठी खरी श्रद्धांजली ! अभिनेते ओंकार खाडिलकर यांचे होतेय कौतुक )
पुढे आपल्या घरी परत जाण्याआधी पंडित भीमसेन जोशी (Pandit Bhimsen Joshi) यांनी कलकत्ता आणि पंजाब येथेही वास्तव्य केले होते. तिथे त्यांनी सवाई गंधर्व यांच्याकडून गायन प्रकार खयालमध्ये गायकीचे बारकावे शिकून घेतले. १९३७ पर्यंत पंडित भीमसेन जोशी यांना एक प्रसिद्ध खयाल गायक म्हणून ओळखले जाऊ लागले. खयालसोबतच ठुमरी आणि भजन गाण्यासाठीही ते प्रसिद्ध होते.
पंडित भीमसेन जोशी (Pandit Bhimsen Joshi) यांचा विवाह १९४४ साली सुनंदा कुट्टी यांच्याशी झाला. त्यांना राघवेंद्र, उषा, सुमंगला आणि आनंद अशी चार मुलं झाली. त्यानंतर १९५१ साली भाग्यश्री नावाच्या एका कन्नड नाटकात काम करणाऱ्या त्यांच्या सहकलाकार वत्सला मुधोळकर यांच्याशी त्यांनी दुसरा विवाह केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community