पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे रविवार, ४ फेब्रुवारी रोजी आसामच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी आसाम राज्यासाठी तब्बल ११ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी आसाम राज्यासाठी केलेल्या प्रकल्पांच्या घोषणांमुळे आसाम आणि ईशान्यचा दक्षिण आशियातील इतर देशांशी संपर्क मजबूत होणार आहे. तसेच या प्रकल्पांमुळे पर्यटन क्षेत्रात रोजगार वाढणार आहेत.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामाख्या ऍक्सेस कॉरिडॉरची पायाभरणी केली. या प्रकल्पांमुळे पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. याशिवाय पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी कामाख्या ऍक्सेस कॉरिडॉरची पायाभरणी केली. हा प्रकल्प पूर्ण झाल्याने यात्रेकरूंना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत. तसेच आसामचे प्रेम हा माझा विश्वास आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. आपली मंदिरे, तीर्थक्षेत्रे आणि श्रद्धास्थाने ही केवळ भेट देण्याची ठिकाणे नाहीत तर आपल्या हजारो वर्षाच्या संस्कृतीची चिन्हे आहेत. अनेक संकटाचा सामना करताना भारत मजबुतीने कसा उभा राहिला याचे पुरावे आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
(हेही वाचा Ajit Pawar : बारामती लोकसभेसाठी अजित पवारांची आव्हानाची भाषा; शरद पवारांवरही टीका )
Join Our WhatsApp Community