मोहनदास करमचंद गांधी यांची हत्या ही मुळात नथुराम गोडसे यांच्या बंदुकीतून निघालेल्या गोळीने झालीच नाही, ती त्याच वेळी दुसऱ्या कुणाच्या तरी बंदुकीच्या गोळीने झाली आहे, असा सप्रमाण दावा वीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी ‘मेक शुअर गांधी इज डेड’ (Make Sure Gandhi Is Dead) या पुस्तकातून केला आहे. हे पुस्तक उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना स्वतः रणजित सावरकर यांनी भेट दिले.
आज लखनऊ स्थित कैम्प कार्यालय पर राष्ट्र नायक वीर सावरकर जी के पौत्र, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक के चेयरमैन श्री रंजीत सावरकर जी से शिष्टाचार भेंट कर कुशल क्षेम लिया।@SavarkarSmarak
@RanjitSavarkar pic.twitter.com/465PURaq7m— Keshav Prasad Maurya (@kpmaurya1) February 4, 2024
रविवार, ४ फेब्रुवारी रोजी रणजित सावरकर यांनी लखनौ येथील कार्यालयात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची भेट घेतली. त्यावेळी रणजित सावरकर यांनी स्वत: लिहिलेले ‘मेक शुअर गांधी इज डेड’ (Make Sure Gandhi Is Dead) हे पुस्तक भेट दिले. रणजित सावरकर हे उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत.
२९ जानेवारीला झाले पुस्तकाचे प्रकाशन
दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात रणजित सावरकर यांच्या ‘मेक शुअर गांधी इज डेड’ (Make Sure Gandhi Is Dead) या पुस्तकाचे प्रकाशन २९ जानेवारी रोजी ‘इकॉनॉमिक टाइम्स’चे माजी संपादक, तसेच राजकीय तज्ज्ञ राजीव सोनी आणि प्रख्यात अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी रणजित सावरकर यांनी, ‘गांधीजींच्या हत्येसाठी नथुराम गोडसे यांना फाशी देणे, हे गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच रामाच्या नावाखाली घडलेलं मोठं पाप आहे. जे पाप या पुस्तकाच्या माध्यमातून बाहेर येत आहे. प्रभु श्रीराम अयोध्येत आले आहेत. त्यांच्या येण्यासोबत हे पापही उघड झाले आहे’, असे म्हटले होते. गांधींसारख्या महत्त्वाच्या व्यक्तीला शासनाने योग्य सुरक्षा का पुरवली नाही, हे एक कोडे आहे. ते सोडविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कपूर कमिशनमध्ये अनेक चुकीच्या गोष्टी मांडण्यात आल्या होत्या. यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करण्यात आली होती. ती थांबविण्यासाठी हे पुस्तक लिहिण्यासाठी मी गेली सात वर्षे संशोधन करत आहे. तेव्हा माझ्या लक्षात आले की, नथुराम गोडसे यांना फक्त निमित्तमात्र करण्यात आले आहे. मुळात हत्या दुसऱ्या कुणीतरी केली असण्याची पूर्ण शक्यता आहे, असेही सावरकर म्हणाले होते. (Make Sure Gandhi Is Dead)
Join Our WhatsApp Community