भारतीय सैन्याचे शौर्य (Military), पराक्रम आणि साहसाची सर्वसामान्यांना जाणीव करून देण्यासाठी २ ते ४ फेब्रुवारीपर्यंत “शौर्य संध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या तीन दिवसांत शालेय विद्यार्थी आणि नागरिकांसह सुमारे १ लाख लोकांनी भेट दिल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट रत्नाकर सिंग यांनी दिली.
मानकापूर येथील क्रीडा संकुल मैदानावर आयोजित कार्यक्रमात या तीन दिवसांत घोडेस्वारीचे प्रदर्शन, डेयरडेव्हिल्स टीमच्या थरारक मोटारसायकल साहसी करामती, केरळच्या कलरीयपट्टू व पंजाबच्या घटना या युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. महाराष्ट्राच्या परंपरागत मल्लखांब सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. पॅरा मोटर्समधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या प्रदर्शनामुळे नागपूर विभागातील नागरिकांना भारतीय लष्कर (Military) आणि त्यांच्या सैनिकांच्या अत्याधुनिक क्षमता आणि पराक्रमाचे साक्षीदार होण्याची अनोखी संधी मिळाली. टी-९० रणगाडा, के-९ वज्रासारखी अत्याधुनिक आर्मर्ड वाहने, पिनाका क्षेपणास्त्र प्रक्षेपक, धनुष आर्टिलरी गन यांसारखी अत्याधुनिक चिलखती वाहने प्रदर्शनात होती. अत्याधुनिक इन्फंट्री सोल्जर आणि स्पेशल फोर्स सोल्जर यांनी प्रगत तंत्रज्ञानासह त्यांची अत्याधुनिक शस्त्रे प्रदर्शित केली.
Join Our WhatsApp Community