Kunal Raut Congress : पंतप्रधान मोदींच्या पोस्टरवर काळं फासणं पडलं महागात ; कुणाल राऊत यांना अटक

पंतप्रधान मोदी सर्वसामान्यांच्या पैशातून केवळ स्वतःची प्रसिद्धी करत आहेत. असा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने शनिवारी (३ फेब्रुवारी) आंदोलन करत नागपूरात जिल्हा परिषदेत लावण्यात आलेल्या पोस्टरवर मोदी ऐवजी भारत शब्दाचे स्टिकर्स चिटकवले.

326
Kunal Raut Congress : पंतप्रधान मोदींच्या पोस्टरवर काळं फासणं पडलं महागात ; कुणाल राऊत यांना अटक

युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut Congress) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिल्हा परिषदेसमोर मोदी सरकारच्या ‘विकसित भारत’ च्या जाहिरातीच्या पोस्टरवर काळं फासण्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी देत ते पोस्टर फाडले. दरम्यान, पोलिसांनी या घटनेच्या संदर्भात कुणाल राऊत यांना अटक करून चौकशीसाठी सदर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले.

(हेही वाचा – Uttarakhand Uniform Civil Bill : समान नागरी विधेयकास मंत्रिमंडळात मंजुरी; विधानसभेत उद्या येणार बिल)

नेमकं प्रकरण काय ? 

पंतप्रधान मोदी सर्वसामान्यांच्या पैशातून केवळ स्वतःची प्रसिद्धी करत आहेत. असा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने (Kunal Raut Congress) शनिवारी (३ फेब्रुवारी) आंदोलन करत नागपूरात जिल्हा परिषदेत लावण्यात आलेल्या पोस्टरवर मोदी ऐवजी भारत शब्दाचे स्टिकर्स चिटकवले. सोबतच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे देखील फासले. या आंदोलनामुळे नागपूर जिल्हा परिषदेत काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

(हेही वाचा – Mufti Salman Azhari : मौलाना मुफ्ती सलमान अजहरीला रातोरात गुजरातमध्ये हलवले; घाटकोपरमध्ये तणावपूर्व शांतता)

पोलिसांकडून चौकशी सुरु –

या प्रकरणानंतर पोलीस कुणाल राऊतांचा सतत शोध घेत होते. दरम्यान, ५ फेब्रुवारी रोजी कारवाई करत सदर पोलिसांनी कुणाल राऊतला ताब्यात घेतले आहे. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (Kunal Raut Congress) अखिल भारतीय युवा काँग्रेसचे सरचिटणीस अजित सिंग यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी राहुलला अटक केली आहे. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते तिथे गेले होते. त्यानंतर नबरंगपूर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. पोलीस त्यांचीही चौकशी करत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.