मराठा आंदोलनापासून (Maratha Reservation) मला कसे बाजूला करायचे, हे आंदोलन कसे अपयशी ठरवायचे, यासाठी २०-२५ जण कार्यरत आहेत, ते समाजात गैरसमज पसरवतात, सरकारकडून त्यांनी सुपारी घेतली आहे, हे राजकीय आणि विरोधक या दोन्हींकडील लोक आहेत. आणि सोशल मीडियात गैरसमज पसरवतात, आंदोलनाला बदनाम करत आहेत, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
(हेही वाचा Mufti Salman Azhari : मौलाना मुफ्ती सलमान अजहरीला रातोरात गुजरातमध्ये हलवले; घाटकोपरमध्ये तणावपूर्व शांतता)
मराठ्यांना काही मिळाले नाही, असे खोटे बोलत आहेत. त्यांना मानसन्मान मिळाला नाही म्हणून ते बोलत असतील, पण आम्ही अजून त्यांची नावे घेत नाही, त्या पक्षांच्या प्रमुखांनी त्यांना आवर घालावे, त्यांचे बोलणे थांबवावे नाहीतर आम्ही दोन दिवसांनंतर त्यांची नावे आणि पक्ष जाहीर करू. त्या पक्षाचे नेते, मंत्री कोण त्यांचीही नावे जाहीर करु, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मी या आंदोलनातून (Maratha Reservation)बाहेर पडावे असे त्यांना वाटत आहे. ७० वर्षे समाजातीलच काही जण प्रयत्न करत होते पण त्यांना यश मिळाले नाही पण आम्हाला मिळाले हे त्यांचे दुखणे आहे, म्हणून ते चुकीचे बोलू लागले आहेत. याचे श्रेय केवळ मराठा समाजाचे आहे. ३९ लाख मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले हे आंदोलनाचे यश आहे. २००० आणि २००१ चा कायदा ओबीसी आरक्षणासाठी झाला होता त्यानुसार २००४, २००८, २०१४ चे कायदे झाले आहेत, असेही जरांगे पाटील म्हणाले.
Join Our WhatsApp Community