Nexalist : मुंबईसह ५ शहरे नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर; काय आहे पोलिसांचा अहवाल?

278
GONDIA: बालाघाट येथे नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक, लाखोंचे बक्षीस असलेल्या २ नक्षलवाद्यांचा खात्मा

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील ५ प्रमुख शहरे ही नक्षलवाद्यांच्या (Nexalist) हिटलिस्टवर आली आहेत. या शहरांमध्ये घातपात घडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा कट आहे, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली आहे. नक्षलवादी सरकारविरोधात असंतोष निर्माण करण्याच्या प्रयत्नांत आहेत. या अंतर्गत त्यांनी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर व गोंदिया या 5 शहरांमध्ये घातपात घडवून आणण्याचा कट रचला आहे.

(हेही वाचा ASI : मथुरेत कृष्ण मंदिर पाडून औरंगजेबाने बांधली मशीद; भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची माहिती)

युनायटेड फ्रंट ही संघटना CPI माओवाद्यांशी संबंधित आहे. ही संघटना शेतकरी, विद्यार्थी यांच्यामार्फत शासनाविरोधात रोष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याला शहरी माओवादीही (Nexalist) म्हणतात. पोलिसांना त्यांची गोपनीय माहिती मिळाली आहे. या संघटनेने पुणे, मुंबई, नागपूर, गोंदिया, नागपूर या शहरांमध्ये आपले नेटवर्क तयार केले आहे. या ठिकाणी शहरी नक्षलवाद पेरणेही सुरु आहे. शहरी नक्षलवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या 54 संस्था आमच्या रडारवर आहेत, असे नागपूरचे पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.