Ind vs Eng 2nd Test : कसोटीत शतक झळकावल्यानंतरही शुभमनला वडिलांची भीती का वाटतेय?

युवा खेळाडू शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमधील आपली तिसरी आणि तिसऱ्या क्रमांकावर खेळताना पहिलंच शतक झळकावलं.

294
Ind vs Eng 2nd Test : शुभमन गिलची दुखापत किती गंभीर?
  • ऋजुता लुकतुके

एखाद्या क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय कसोटीत शतक झळकावलं असेल तर स्वत:च्या कामगिरीवर त्याने खुश असायला हवं. पण, भारताचा उगवता खेळाडू शुभमन गिल (Shubman Gill) मात्र विशाखापट्टणम कसोटीच्या तिसऱ्या दिवशी काहीसा घाबरलेलाच होता. खरंतर गेल्यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर शुभमन (Shubman Gill) फारसा फॉर्ममध्ये नाही. आणि अलीकडेच संघ प्रशासनाने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली नाही तर पुन्हा रणजी खेळण्याची तंबी त्याला दिली होती. (Ind vs Eng 2nd Test)

असं असताना योग्य वेळी त्याने शतक झळकावलं, त्यामुळे तो समाधानी पाहिजे होता. इंग्लंड विरुद्ध विशाखापट्टणम कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने १४७ चेंडूंत १०४ धावा केल्या. इतकंच नाही तर भारतीय डावाला आकार देत इंग्लंड समोर ३९९ धावांचं आव्हान ठेवण्यातही त्याने मोठी भूमिका बजावली. (Ind vs Eng 2nd Test)

(हेही वाचा – Nexalist : मुंबईसह ५ शहरे नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर; काय आहे पोलिसांचा अहवाल?)

हे आहेत गिलचे क्रिकेटमधील मुख्य मार्गदर्शक 

पण, सामन्या नंतरच्या पत्रकार परिषदेत तो गप्पच होता. आणि कारण विचारल्यावर तो म्हणाला, ‘वडील माझी हॉटेलमध्ये वाट बघत असतील. आणि ज्या प्रकारे बाद झालो ते पाहता ते माझं चांगलं स्वागत करणार नाहीत, असंच वाटतंय. वडीलांचा मूड नेमका कसा असेल याचीच भीती वाटतेय.’ (Ind vs Eng 2nd Test)

शुभमन (Shubman Gill) प्रांजळपणे हे म्हणाला. त्याचे वडील लखविंदर सिंग हे कसोटी सामना पाहण्यासाठी मैदानात हजर होते. आणि शुभमनच्या (Shubman Gill) कारकीर्दीत त्याचं योगदान मोठं आहे. त्याने क्रिकेट शिकावं म्हणून ते चंदिगडमध्ये मोहाली स्टेडिअमच्या जवळ स्थायिक झाले. अनेकदा ते त्याच्याबरोबर दौऱ्यातही साथ देतात. आणि त्याच्याशी क्रिकेटवर गप्पा मारतात. ते त्याचे क्रिकेटमधील मुख्य मार्गदर्शक आहेत. आणि त्याचे सगळ्यात मोठे टीकाकारही आहेत. (Ind vs Eng 2nd Test)

(हेही वाचा – PM Narendra Modi : विपश्यना अधिक स्वीकार्य बनवण्यासाठी भारताने पुढाकार घेण्याची गरज)

भारतीय संघ ही कसोटी जिंकू शकेल – गिल 

म्हणूनच शतक केल्यानंतरही जो फटका खेळून शुभमन बाद झाला, तो वडिलांना नक्कीच आवडणार नाही, याची त्याला भीती वाटतेय. इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने ५६ व्या षटकांत क्षेत्ररक्षक रेहान अहमदची जागा बदलून त्याला ऑनसाईडला आणलं. त्यामुळे ऑफसाईडला बरीच जागा मोकळी होती. तिथे चेंडू मारण्याच्या इराद्याने शुभमनने (Shubman Gill) शोएब बशिरच्या एका चेंडूंवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. आणि नेमका तो फसला. चेंडू हवेत उडाला आणि यष्टीरक्षक बेन फोक्सने तो झेल टिपला. (Ind vs Eng 2nd Test)

एकतर प्रतिस्पर्धी कर्णधाराच्या जाळ्यात शुभमन (Shubman Gill) फसला आणि असा विचित्र फटका खेळून बाद झाला म्हणून वडील आपल्यावर चिडतील, असं शुभमनला वाटत होतं. पण, त्याचबरोबर शतकामुळे भारतीय डावाला आकार मिळाला आणि इंग्लंडसमोर ३९९ धावांचं आव्हान उभं राहू शकलं, याचंही त्याला समाधान आहे. खेळपट्टीचं स्वरुप पाहता, भारतीय संघ ही कसोटी जिंकू शकेल असं त्याला वाटतंय. (Ind vs Eng 2nd Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.