Paralympic Committee of India Suspended : भारताची पॅरालिम्पिक संघटना क्रीडा मंत्रालयाने निलंबित का केली?

पॅरालिम्पिक खेळांची संघटना देशाच्या क्रीडा धोरणाचं पालन करत नसल्याचा ठपका क्रीडा मंत्रालयाने ठेवला आहे. 

176
Paralympic Committee of India Suspended : भारताची पॅरालिम्पिक संघटना क्रीडा मंत्रालयाने निलंबित का केली?
  • ऋजुता लुकतुके

देशातील पॅरालिम्पिक खेळांसाठी असलेली संघटना वेळेवर कार्यकारिणीच्या निवडणुका घेत नाहीए. आणि त्यांची ही कृती जाणून बुजून केलेली तसंच देशाच्या क्रीडा धोरणाशी विसंगत असल्याचा ठपका ठेवत क्रीडा मंत्रालयाने पॅरालिम्पिक संघटना निलंबित केली आहे. इतकंच नाही तर संघटनेच्या जागी तात्पुरत्या समितीची स्थापनाही करण्यात आली आहे. आणि हे बदल तातडीने जागतिक पॅरालिम्पिक संघटनेलाही कळवण्यात आले आहेत. (Paralympic Committee of India Suspended)

भारतीय पॅरालिम्पिक संघटनेची सध्याची अध्यक्ष होती २०१६ च्या रिओ पॅरालिम्पिक खेळांमध्ये देशाला सुवर्ण जिंकून देणारी दीपा मलिक. पण, तिच्या कारभाराविषयी अनेकांच्या तक्रारी आहेत. पण, या निलंबनाचा एक अर्थ असाही होतो की, सध्याच्या परिस्थितीत भारतीय पॅरा ॲथलीट पॅरिस पॅरालिम्पिक खेळांमध्ये राष्ट्रीय ध्वजाखाली खेळू शकणार नाहीत. (Paralympic Committee of India Suspended)

(हेही वाचा – BMC : महापालिकेला ‘जी सर’ म्हणणाऱ्या प्रशासकांची गरज नाही, तर..!)

यामुळे निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले नाहीत 

देशाच्या पॅरालिम्पिक संघटनेचा कारभार मागची काही वर्ष कोर्ट कचेरीतच अडकला आहे. संघटनेची शेवटची निवडणूक २०१९ मध्ये झाली होती. पण, त्या दरम्यान दिल्ली हायकोर्टाने संबंधित एका याचिकेवर सुनावणी करताना या निवडणुकीच्या अध्यादेशावरच स्थगिती आणली. त्यामुळे निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले नाहीत. (Paralympic Committee of India Suspended)

प्रकरण काही काळ कोर्टात चालल्यानंतर २०२० मध्ये निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. आणि ४ जणांच्या समितीने पॅरालिम्पिक संघटनेचा कारभार हाती घेतला. या समितीची मुदत ४ वर्षांनी म्हणजे ३१ जानेवारी २०२४ मध्ये संपत होती. पण, त्यापूर्वी नवीन निवडणुकांसाठी या संघटनेनं कुठलीही पावलं उचलली नाहीत, असं क्रीडा मंत्रालयाचं म्हणणं आहे. त्यामुळे ३ फेब्रुवारीलाच क्रीडा मंत्रालयाने संघटनेवर निलंबनाची कारवाई केली आहे. पॅरा ॲथलीटचं नुकसान होऊ नये आणि पॅरालिम्पिक खेळांत त्यांना देशाकडून खेळता यावं याचा प्रयत्न करणार असल्याचं क्रीडा मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय संघटनेला कळवलं आहे. (Paralympic Committee of India Suspended)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.