भारत आणि चीनमधील (India – China) वाद हा काही नवीन मुद्दा नाही. अशातच सध्या चीनने भारताच्या शेजारील प्रदेशात आपली लष्करी उपस्थिती वाढवली आहे. तो हळूहळू श्रीलंका, मालदीव, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश यासारख्या देशांमध्ये घुसखोरी करत आहे. त्यामुळे भारताच्या सुरक्षेची चिंता निर्माण होत आहे. तथापि, भारतानेही याला चोख प्रत्युत्तर म्हणून श्रीलंकेत भारतीय नौदलाची शक्तिशाली पाणबुडी उतरवली पोहोचली.
भारतीय नौदलाने (India – China) आय. एन. एस. करंज ही पाणबुडी श्रीलंकेच्या मुख्य बंदरांपैकी एका बंदरावर पाठवली आहे, असे डेक्कन हेराल्ड यांनी सांगितले आहे. यामुळे चीन तसेच मालदीवला एक भक्कम संदेश गेला आहे, जे सध्या चीनच्या कटात अडकले आहेत. चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्हीचे हेरगिरी जहाज ‘जियांग यांग हाँग ३’ मालदीवच्या दिशेने जात असताना आयएनएस करंज शनिवारी (३ फेब्रुवारी) श्रीलंकेत दाखल झाले.
(हेही वाचा – Ind vs Eng 2nd Test : डीआरएस घ्यायचा की नाही यावर कुलदीप आणि रोहितचं मजेशीर संभाषण व्हायरल)
पाणबुडीची माहिती श्रीलंकेच्या नौदलाला दिली –
भारतीय नौदलाच्या डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी आय. एन. एस. करंजचे कोलंबो बंदरावर (India – China) आगमन झाल्यानंतर श्रीलंकेच्या नौदलाने औपचारिक स्वागत केले. कोलंबोमधील नवी दिल्लीचे राजदूत संतोष झा यांनी पाणबुडीला भेट दिली आणि कमांडिंग ऑफिसर, कमांडर अरुणाभ आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. श्रीलंकेच्या नौदलाच्या सुमारे १०० नामनिर्देशित कर्मचाऱ्यांना पाणबुडीबद्दल माहिती देण्यात आली.
कमांडिंग ऑफिसरने नंतर श्रीलंकेच्या (India – China) नौदलाच्या पश्चिम नौदल क्षेत्राचे कमांडर रियर अॅडमिरल समन परेरा यांची भेट घेतली. श्रीलंकेच्या राजधानीतील भारतीय उच्चायुक्तालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पाणबुडी सोमवारी (५ फेब्रुवारी) कोलंबो बंदरातून निघेल.
(हेही वाचा – BMC : महापालिकेला ‘जी सर’ म्हणणाऱ्या प्रशासकांची गरज नाही, तर..!)
चीनला संदेश देण्याचा भारताचा उद्देश –
रविवारी (४ फेब्रुवारी) श्रीलंकेचा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना नौदलाने ही पाणबुडी (India – China) श्रीलंकेला पाठवली आहे. हिंद महासागर प्रदेशात सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने भारताने श्रीलंकेत पाणबुडी उतरवली आहे. तसेच भारत चीनला प्रत्युत्तर देण्यास तयार असलाच संदेश देखील भारताने यानिमित्ताने दिला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community