लग्नसराई म्हटलं की, खरेदी आली. पैठणी, नऊवारी साड्या, सिल्कच्या साड्या, शालू असे विविध पारंपरिक पोषाखांची खरेदी आलीच. लग्नात परिधान करायच्या पारंपरिक पोषाखांमध्ये सध्या ‘लेहंगा’ (hair style for lehenga) किंवा ‘लेहंगा-चोली’ सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. परिधान करायला हलका, सहज…त्यावर नक्षीकाम केला सुंदर दुपट्टा घेतला की, हा पोषाख अधिकच खुलून दिसतो. सुंदर मणी, रेशमाच्या दोऱ्यांनी केलेलं भरतकाम…यामुळे अगदी संगीत, मेहंदी समारंभातही तरुणी लेहंगा परिधान करण्याला पसंती देतात. आकर्षक आणि सुंदर लेहंगा परिधान केल्यावर तुम्ही केलेली आकर्षक ‘केशभूषा’यामुळे (hair style for lehenga) तुमच्या सौंदर्यात भर पडतेच शिवाय चारचौघात तुमचे व्यक्तिमत्त्व उठून दिसायलाही मदत होते. त्यामुळे सुंदर लेहंग्यावर आकर्षक केशभूषा कशी करायची, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर या माहितीची तुम्हाला मदत होऊ शकते.
लेहंग्यावर चमकदार अॅक्सेसरीजसह केशभूषेचा कोणता प्रकार चेहऱ्यानुसार आकर्षक वाटू शकतो, याचा विचार होणेही आवश्यक आहे. याकरिता स्वत:करिता कोणती केशभूषा निवडावी यासाठी अद्ययावत फॅशन प्रकारांची मदत घेऊ शकता. हे सर्व करण्याआधी केसांची योग्य ती काळजी घेणेही आवश्यक आहे. त्यामुळे केसांचे दैनंदिन नुकसान होण्यापासून संरक्षण होऊ शकते. केस निरोगी आणि चमकदार कसे राहतील याकडे लक्ष द्यावे. केसांना डव्ह डेली शाइन कंडिशनर वापरावा. ते मऊ, मुलायम राहतील यांची काळजी घ्यावी. मऊ, रेशमी केस दिसावेत याकरिता सिरमचाही वापर करावा.
मध्यम लांबीचे केस
मध्यम लांबीच्या केसांना अनेकदा ट्रिकी हेअरस्टाइल छान दिसू शकते. विशेषतः लेहंगा परिधान करणार असला आणि तुमचे केस मध्यम लांबीच्या केसांची हेअर स्टाईल करणे हा उत्तम मार्ग आहे. तुमचे खांद्यावर दोन्ही बाजूंनी सोडा.
टेक्श्चर आणि रोझ बन
ट्रॅडिशनल गजरा किंवा फ्लोलर पिन्स केसांत लावण्यासाठी स्टायलिश आंबाड्याची हेअर स्टाईल करता येईल. विशेषत: लग्न समारंभाच्या दिवशी अशा पद्धतीची केशरचना जास्त आकर्षक दिसते. लग्न समारंभावेळी केसांचा स्टायलिश लूझ आंबाडा आणि त्यामध्ये खोवलेलं गुलाबाच फूल किंवा गुलाबाची ३-४ फुले तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवण्यास मदत करू शकतात. याकरिता टेक्श्चर बनमुळे केसांचे सौंदर्य वाढते.
हाफ अप-हाफ डाउन
ही केशरचना अत्यंत प्रसिद्ध आहे. बऱ्याच जणांना या प्रकारची केशभूषा करायला आवडते. लेहेंगामध्ये हाफ अप, हाफ डाउन हेअरस्टाइल खूप लोकप्रिय आहे.शीर्षस्थानी डच वेणी असलेली आणि खालची केशरचना सैल फिरवणारी ही शैली बऱ्याच जणांना आवडते. सरळ, बारीक केसांकरिता ही केशरचना छान दिसते.
फिशटेल वेणी
फिशटेल वेणी ही नववधूच्या केशरचनेसाठी प्रसिद्ध केशरचना आहे. साइड फिशटेल वेणीची केशरचनाही सुंदर आहे. याकरिता विविध प्रकारे ऍक्सेसरीझचा वापर केला जाऊ शकतो. नैसर्गिकरित्या जाड आणि लांबसडक केसांसाठी ही केशरचना योग्य आहे. जे वेणीमध्ये बाहेर राहण्यापासून संघर्ष करतात. फ्लोरल ऍक्सेसराईझिंग आणि मांग टिक्का याकरिता ही केशरचना योग्य आहे.
आकर्षक केशरचना करण्याआधी…
– प्युअर मॉइश्चर बूस्ट हेअर सीरम वापरा.
– मध्यम-लांबीचे केस टोकापर्यंत हायड्रेशन सील करण्यासाठी आणि फ्रिज कमी करण्यासाठी हे सीरम ॲलो एसेन्सने परिपूर्ण आहे. यामुळे केस लवकर चमकदार होतात.
– केसांना सलून-फिनिश, नितळ आणि चमकदार लूक मिळतो. केसांची योग्य ती काळजी घ्या. केसांना वेळच्या वेळी तेल लावा आणि आहारातही पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community