- ऋजुता लुकतुके
झी एंटरटेनमेंट कंपनी सोनी बरोबरचा विलिनीकरणाचा करार पार पडावा यासाठी प्रयत्न करत राहणार असल्याचं रॉयटर्सने आपल्या बातमीत म्हटलं आहे. सिंगापूर लवादाने सोनीची याचिका फेटाळल्यानंतर झी कंपनीला आणखी बळ मिळालं असून आता सोनीने ठरल्या प्रमाणे विलिनीकरण पार पाडावं यासाठी भारतीय ट्रिब्युनलकडे दाद मागण्याचं ठरवलं आहे. (Zee Sony Merger Deal Fallout)
सोनी आणि झी कंपनी दरम्यान विलिनीकरणाच्या करारवर मागची २ वर्षं चर्चा सुरू होती. हे विलिनीकरण झालं असतं तर भारतातील सगळ्यात मोठी मनोरंजन क्षेत्रातील कंपनी उभी राहू शकली असती. पण, २२ जानेवारीला सोनी कंपनीने हा करार एकतर्फी रद्द केला. त्यानंतर झी कंपनी सोनीला आधी ठरल्याप्रमाणे हा करार पार पाडण्यासाठी कायदेशीर मदत घेता येते काय याची चाचपणी करत आहे. (Zee Sony Merger Deal Fallout)
(हेही वाचा – PayTm Crisis : पेटीएमचे विजय शेखर रिझर्व्ह बँकेशी चर्चा करणार)
Singapore arbitrator lets Zee go to India tribunal to enforce Sony merger deal -Zee https://t.co/WOaiYnL1hY pic.twitter.com/q4ZCVIavQi
— Reuters (@Reuters) February 4, 2024
आता झी कंपनी त्यासाठी भारतीय न्यायाधिकरणाचा दरवाजा ठोठावणार असल्याचं समजतंय. सोनी कंपनीने अलीकडेच सिंगापूरच्या लवादाकडे या प्रकरणात दाद मागितली होती. पण, दोनच दिवसांपूर्वी त्यांची आपत्कालीन सुनावणीची मागणी लवादाने फेटाळली. आता सोनी सिंगापूर लवादात पुन्हा अपील करणार आहे. तर या निर्णयामुळे झीला बळ मिळालं असून ते भारतीय लवादाकडे प्रयत्न करणार आहेत. कारण, सोनी-झी मधील कराराला एनसीएलटी लवादाने आधी परवानगी दिली होती. त्यामुळे आता झी त्यांच्याकडे दाद मागू शकते. (Zee Sony Merger Deal Fallout)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community