चंदीगड महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रकरणी ‘ही लोकशाहीची थट्टा आहे’, अशा शब्दांत सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी फटकारले. सर्वोच्च न्यायालयात ५ फेब्रुवारी रोजी चंदीगड (Chandigarh) महापौर निवडणुकीवर सुनावणी झाली. मुख्य न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधिशांच्या खंडपिठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. पीठासीन कार्यालयाने कथितपणे मते रद्द केल्याचा व्हिडिओही मुख्य न्यायाधिशांनी पाहिला. (Chandigarh Mayor Election)
(हेही वाचा – Narendra Modi: माझ्या कार्यकाळात भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, पंतप्रधानांचा लोकसभेत दावा)
‘जे घडले, त्यामुळे आम्हाला धक्का बसला आहे. आम्ही अशा प्रकारे लोकशाहीची हत्या होऊ देऊ शकत नाही’, असे सरन्यायाधीश म्हणाले. या वेळी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरन्यायाधिशांनी निवडणुकीचा संपूर्ण व्हिडिओ सादर करण्यास सांगितले आहे आणि नोटीसही जारी केली आहे.
नवीन महापौरांचे काम स्थगित
भाजप नेते कुलदीप सिंह सेंगर (Kuldeep Singh Sengar) यांनी चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक अधिकाऱ्याला नोटीस बजावली आहे. ही संपूर्ण नोंद सर्व कागदपत्रे आणि व्हिडिओ पुराव्यांसह पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या कुलसचिवांकडे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ठेवली जाईल.
सर्वोच्च न्यायालयाने 7 फेब्रुवारी रोजी नियोजित असलेली चंदीगड महानगरपालिकेची पहिली बैठक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या नवीन महापौरांचे काम काही काळासाठी स्थगित राहील.
(हेही वाचा – Mohan Bhagwat : कट्टरतेच्या सर्व भिंती तोडून एकसंघ भारत बनवणे आपले कर्तव्य)
मुख्य न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील खंडपिठाने म्हटले की, आम्ही निर्देश देतो की, चंदीगड महानगरपालिकेच्या निवडणुकांची संपूर्ण नोंद उच्च न्यायालयाकडे जप्त केली जावी. मतपत्रिका, व्हिडिओग्राफी देखील जमा केली जावी. ते नोंदी सुपूर्द करतील, अशी नोटीस निवडणूक अधिकाऱ्याला देण्यात आली आहे.
महापौर निवडणुकीत काय घडले ?
ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांनी निवडणूक प्रक्रियेत काय घडले, हे पहाण्यासाठी मुख्य न्यायाधिशांना पेन ड्राइव्ह दिला. त्या पेन ड्राइव्हमधील व्हिडिओत निवडणूक अधिकारी अनिल मसिह मतपत्रिकेवर पेन चालवतांना दिसत आहेत. तसेच भाजपाचे उमेदवार मागच्या दारातून येऊन महापौरांच्या खुर्चीवर कसे येतात आणि बसतात, तेही दिसत आहे.
“ही लोकशाहीची हत्या आहे”, (murder of democracy) असे सांगून मुख्य न्यायाधीश म्हणाले की, पीठासीन अधिकाऱ्याने मतपत्रिकेशी छेडछाड केली, हे स्पष्ट आहे. त्यांच्यावर खटला भरला पाहिजे. ही लोकशाहीची थट्टा आहे, असे ते म्हणाले. लोकशाहीची हत्या केली जात आहे, आम्हाला आश्चर्य वाटते. हे निवडणूक कार्यालयाची वागणूक आहे का, असा प्रश्न सरन्यायाधिशांनी केला. कृपया निवडणूक अधिकाऱ्याला सांगा की, सर्वोच्च न्यायालय त्यावर लक्ष ठेवून आहे.”
आमच्या सद्सद्विवेक बुद्धीला संतुष्ट करावे लागेल, अन्यथा नव्याने निवडणुका घ्याव्या लागतील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 फेब्रुवारीला होणार आहे. (Chandigarh Mayor Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community