Mohan Bhagwat : कट्टरतेच्या सर्व भिंती तोडून एकसंघ भारत बनवणे आपले कर्तव्य

राष्ट्रातील शाश्वत मूल्यांची जपणूक व आचरण करणे हे सर्व संत महंतांचे योगदान महत्त्वपूर्ण असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध संत महंत एकत्रित येऊन प्रबोधन करणार आहेत, हा अमृत योग असल्याचे डॉ. भागवत यांनी सांगितले.

219
Mohan Bhagwat : कट्टरतेच्या सर्व भिंती तोडून एकसंघ भारत बनवणे आपले कर्तव्य

संपूर्ण विश्वाला भारताची गरज आहे. आपले ज्ञान आणि विज्ञान ही आपली परंपरा आहे. हे ज्ञान आपल्याला विश्वाला द्यायचे आहे. त्यामुळे कट्टरतेच्या सर्व भिंती तोडून एकसंघ, एकरस, सुखी सुंदर भारत बनवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले. (Mohan Bhagwat)

श्री क्षेत्र आळंदी येथील स्वामी गोविंददेवगिरी महाराजांच्या ‘गीता भक्ती अमृत महोत्सवी’ कार्यक्रमाचा शुभारंभ डॉ. भागवत (Mohan Bhagwat) यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर स्वामी राजेंद्रदास महाराज, स्वामी गोविंददेवगिरी महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी, सदानंद महाराज, मारोतीबाबा कुरेकर महाराज, लोकेशमुनी, प्रणवानंद महाराज आदिंची प्रमुख उपस्थिती होती. अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्यासह उपस्थित मान्यवर, संतांचा यावेळी सन्मान करण्यात आला. (Mohan Bhagwat)

(हेही वाचा – Yashoda Ganesh Savarkar : तात्यारावांचे प्रेरणास्थान, शक्तीस्थान असणाऱ्या येसूवहिनींचे कृतज्ञ स्मरण!)

संमेलनातून विश्व कल्याणासाठी मंथन होईल – भागवत 

राष्ट्रातील शाश्वत मूल्यांची जपणूक व आचरण करणे हे सर्व संत महंतांचे योगदान महत्त्वपूर्ण असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध संत महंत एकत्रित येऊन प्रबोधन करणार आहेत, हा अमृत योग असल्याचे डॉ. भागवत (Mohan Bhagwat) यांनी सांगितले. महाभारतानंतर ज्याप्रमाणे नैमिषरण्यात ऋषी संमेलन होऊन शास्त्रावर मंथन झाले, त्याचप्रमाणे इथेही या निमित्ताने अनेक संत महंत एकत्रित येत आहेत. त्यातून विश्व कल्याणासाठी मंथन होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Mohan Bhagwat)

डॉ. भागवत (Mohan Bhagwat) पुढे म्हणाले, अयोध्येत २२ जानेवारीला श्रीरामलला विराजमान झाले आहेत. जे जे मंगल घडते आहे ती ईश्वराची इच्छा आहे. देशातील महापुरुष, संत महात्म्यांच्या सामर्थ्य आणि पुरुषार्थामुळे हे शक्य होत आहे. ही नियतीची योजना आहे, जे झोपले आहेत त्यांना जागे करण्यासाठी संत कायम प्रयत्नरत असतात. ज्ञानाचे अनुसंधान करणारे ऋषी असतात व ते सर्वत्र पोहचविण्यासाठी घुमंतू बंधू पुरातन काळापासून सातत्याने प्रयत्न करीत आहेत. ग्रामीण भागातील बांधव हे संपूर्ण विज्ञान तंत्रज्ञान समजू शकत नाही, असे अनेकांना वाटते. परंतु ते जुन्या काळापासून अनेक छोटे छोटे विज्ञाननिष्ठ प्रयोग करीत असतात हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. (Mohan Bhagwat)

(हेही वाचा – Coal Ministry ने जानेवारीत इतक्या दशलक्ष टन उत्पादनाचा गाठला टप्पा)

जग बदलत असले तरी आपण आपले मूळ विसरू नये

श्रद्धा, भक्ती आणि समर्पण हे जनमानसात असणारे गुण आहेत. त्यात सातत्य ठेवण्याचे काम संत, विद्वान करत असतात. त्यामुळेच संत ज्ञानेश्वरांनी ईश्वर निष्ठाची मांदियाळी मागितली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असे स्पष्ट केले. त्यामुळेच असे सात्त्विक कार्यक्रम होणे ही नियतीची इच्छा आहे. जग बदलत असले तरी आपण आपले मूळ विसरू नये. ज्ञान आणि विज्ञान याची आपल्याकडे परंपरा आहे. आपल्याला विश्वाला ज्ञान द्यायचे आहे. भारत विश्वगुरू होण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नरत राहायला हवे. (Mohan Bhagwat)

याठिकाणी होत असलेले संत संमेलन हे ज्ञान आणि भक्तीच्या संगमातून होत आहे. कर्माविना भक्ती अपंग असून गीतेतील ज्ञान, कर्म, भक्ती या पायावर सर्वांनी लक्ष केंद्रित करून येथील कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन भागवत (Mohan Bhagwat) केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी श्री क्षेत्र अयोध्या येथे प्रकाशित केलेले डाक तिकीट स्वामी गोविंददेवगिरी महाराजांना यावेळी भेट म्हणून पाठवले. भाजपचे माजी उपाध्यक्ष शाम जाजू, आ. महेश लांडगे यांच्या उपस्थितीत डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी ते प्रदान केले. यावेळी स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देशभक्तीचे मुक्त विद्यापीठ असून सेवाव्रती कार्य करत राहणार असल्याचे सांगितले. (Mohan Bhagwat)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.