भारतात अधिक मेहनत करण्याची सवय नाही. जेवढे काम युरोप, जपान, रशिया, अमेरिका किंवा चीनमधील लोक करतात, तेवढे काम आम्ही करत नाही. त्यांचा समाज चमत्काराने विकसित झालेला नसून मेहनत आणि हुशारीच्या बळावर विकसित झाला आहे. नेहरु भारतीय नागरिकांना आळशी समजत होते. भारतीय कमी अक्कल असलेले आहेत, असे नेहरूंचे (Jawaharlal Nehru) म्हणणे होते. इंदिरा गांधी यांचीही विचारसरणीही यापेक्षा वेगळी नव्हती, असे परखड उद्गार पंतप्रधान मोदींनी काढले आहेत. (PM Modi Criticizes Congress)
(हेही वाचा – PM Modi Criticize Congress : जनतेचा आशीर्वाद असेल, तर विरोधक प्रेक्षक गॅलरीतही बसतील; पंतप्रधानांची कॉंग्रेसवर सडकून टीका)
काँग्रेसचा देशाच्या सामर्थ्यावर विश्वास नाही
या वेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “काँग्रेसच्या मानसिकतेमुळे देशाचे खूप नुकसान झाले. काँग्रेसने (Congress) देशाच्या सामर्थ्यावर कधीही विश्वास ठेवला नाही. त्यांनी स्वतःला शासक मानले आणि जनतेपासून अंतर ठेवून त्यांना कमी समजले. काँग्रेस देशातील नागरिकांबद्दल कसा विचार करते, याबद्दल मी बोललो, तर काँग्रेसला राग येतो. १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून तत्कालीन पंतप्रधानांनी (Jawaharlal Nehru) जे सांगितले होते, ते पुन्हा वाचून दाखवतो.”
इंदिरा गांधी म्हणतात, संकट आले की, भारतीय नाउमेद होतात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट रोजी केलेले भाषण वाचून दाखवले. इंदिरा गांधी (Indira Gandhi) म्हणाल्या होत्या, ”दुर्दैवाने आमचे काम जेव्हा पुर्णत्वास जात असते, तेव्हा आम्ही आत्मसंतुष्ट होतो आणि जेव्हा आमच्यासमोर संकट येते, तेव्हा नाउमेद होऊन जातो. कधी कधी तर असे वाटते की, संपूर्ण राष्ट्राने पराजय भावना स्वीकारली आहे.” आजच्या काँग्रेसच्या लोकांकडे पाहिल्यावर असे वाटते, इंदिराजींनी भलेही देशातील लोकांचे आकलन चुकीचे केले असेल. काँग्रेसचे अतिशय अचूक असे आकलन त्यांनी केले होते”, असे पंतप्रधान म्हणाले.
(हेही वाचा – Chandigarh Mayor Election : ही लोकशाहीची हत्या आहे; चंदीगडच्या महापौर निवडणुकीवर सर्वोच्च न्यायालय संतप्त)
काँग्रेसच्या गतीने विकासाला १०० वर्षे लागली असती
आम्ही ग्रामीण भागातील गरिबांसाठी चार कोटी घरे बांधली. शहरी गरिबांसाठी ८० लाख पक्की घरे बांधली. जर काँग्रेसच्या गतीने गेलो असतो, तर या विकासाला १०० वर्षे लागली असती. या कामासाठी पाच पिढ्या लागल्या असत्या. १० वर्षांत ४० हजार किलोमीटर रेल्वे ट्रॅकचे इलेक्ट्रिफिकेशन झाले. जर काँग्रेसच्या वेगाने गेलो असतो, तर या कामाला ८० वर्षे आणि चार पिढ्या लागल्या असत्या. आम्ही दहा वर्षांत १७ कोटी गॅस कनेक्शन दिले, काँग्रेसच्या गतीने या कामासाठी ६० वर्षे लागले असते. तीन पिढ्या धुरात गुदमरल्या असत्या, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. (PM Modi Criticizes Congress)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community