Arvind Kejriwal यांच्या निकटवर्तींयांवर ईडीची छापेमारी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव आणि आम आदमी पार्टीशी संबंधित काही लोकांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) छापे टाकत आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

211
Arvind Kejriwal यांच्या निकटवर्तींयांवर ईडीची छापेमारी

दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणातील कथित घोटाळ्याच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) टीम सातत्याने कारवाई करत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे स्वीय सचिव वैभव कुमार आणि इतरांच्या घरांवर अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) छापे टाकण्यात आले आहेत.

पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रीय राजधानीतील सुमारे १० ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. (Arvind Kejriwal)

(हेही वाचा – Ajit Pawar : शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर अजित पवारांचा खुलासा, म्हणाले…)

वैभव कुमार आणि दिल्ली जल मंडळाचे माजी सदस्य शलभ कुमार, आपचे खासदार एन. डी. गुप्ता यांच्यासह इतर काही जणांच्या ठिकाणांची केंद्रीय एजन्सीचे अधिकारी चौकशी करत आहेत. (Arvind Kejriwal)

सूत्रांच्या माहितीनुसार, ईडी मनी लाँड्रिंगच्या चौकशीचा एक भाग म्हणून आम आदमी पार्टीशी संबंधित असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या वैयक्तिक सचिवांच्या निवासस्थानासह सुमारे १० ठिकाणी सर्च ऑपरेशन करणार आहे.

(हेही वाचा – Teacher Recruitment : शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध, आता मुलाखत न देताही मिळणार नोकरी)

आम्हाला धमकवण्यासाठी छापेमारी –

दिल्ली सरकारमधील (Arvind Kejriwal) कॅबिनेट मंत्री असलेल्या आतिशी यांनी ईडीच्या कारवाईला पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या की, आम्हाला धमकावण्यासाठी आणि गप्प करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या घरांवर ईडीचे छापे टाकले जात आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.