FIH Pro League Hockey : भारतीय महिलांचा नेदरलँड्सकडून १-३ ने पराभव

भारतीय महिला हॉकी संघाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात सातत्याने अपयश येत आहे. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला डच संघाने पेनल्टी कॉर्नर मिळवला. यिबी यानसेनने त्यावर देखणा गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली.

202
FIH Pro League Hockey : भारतीय महिलांचा नेदरलँड्सकडून १-३ ने पराभव
ऋजुता लुकतुके

हॉकी प्रो लीग (FIH Pro League Hockey) स्पर्धेत नेदरलँड्स महिला संघाने भारतीय संघाचा ३-१ असा पराभव केला. ऑलिम्पिक सुवर्ण आणि जागतिक अजिंक्यपद पटकावलेल्या नेदरलँड्स संघाने आपण अव्वल संघ असल्याचं या सामन्यात दाखवून दिलं. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला डच संघाने पेनल्टी कॉर्नर मिळवला. आणि यिबी यानसेनने त्यावर देखणा गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारतीय संघ कायम डच संघाच्या मागेच राहिला. यिबीचा हा चेंडू भारतीय गोलकीपर सविताच्या पायांमधून निघून गेला.

(हेही वाचा – Ajit Pawar : शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर अजित पवारांचा खुलासा, म्हणाले…)

या गोलनंतर भारतीय संघाने सामन्यात बरोबरीचा जोरदार प्रयत्न केला. (FIH Pro League Hockey) त्यांना १५ व्या मिनिटाला यशही आलं. डी मधून चेंडूला गोळजाळ्याची दिशा दाखवत नवनीत कौरने भारताचा पहिला गोल केला. सुनेलिता टोपोच्या अचूक पासवर नवनीतने मैदानी गोलची ही संधी घालवली नाही.

सुनेलिताने या पाससाठी एक सुंदर चाल रचली होती. मध्यरेषेपासून ती चेंडूचा (FIH Pro League Hockey) ताबा मिळवत डी पर्यंत धावत आली. आणि मोक्याच्या क्षणी तिने चेंडू नवनीतकडे दिला. आणि नवनीतने या संधीचं सोनं केलं. पण, या देखण्या मैदानी गोल व्यतिरिक्त भारतीय संघाकडून चुकाही भरपूर झाल्या.

(हेही वाचा – कुत्र्याने न खाल्लेले बिस्कीट दिले कार्यकर्त्याला; Rahul Gandhi झाले ट्रोल)

एकतर पेनल्टी कॉर्नरवरचं (FIH Pro League Hockey) अपयश पुन्हा एकदा उठून दिसलं. याउलट डच संघाने आक्रमक खेळ सुरूच ठेवला. तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच आणखी दोन गोल करत डच संघाने हा सामना आरामात जिंकला. तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला फे व्हॅन देअर एल्सने पेनल्टी कॉर्नरवर संघाचा दुसरा गोल केला. आणि २-१ अशी आघाडी संघाला मिळवून दिली. तर चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीला यानसेनने पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरवर गोल करत ही आघाडी ३-१ अशी नेली. (FIH Pro League Hockey)

त्यानंतर भारतीय संघाला (FIH Pro League Hockey) सावरण्यासाठी वेळही नव्हता. भारतीय गोलकीपर सविताची कामगिरी मात्र चांगली झाली. तिने तीन पेनल्टी कॉर्नर सुरेखरित्या अडवले. भारतीय संघाचा हा सलग दुसरा पराभव होता. आता त्यांची गाठ बुधवारी ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे. (FIH Pro League Hockey)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.