Lok Sabha Election 2024 : मतदारयादीतून वगळली 1.66 कोटी मतदारांची नावे

Lok Sabha Election 2024 : देशातील आसाम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा ही सहा राज्ये वगळता संपूर्ण देशात या यादीत सुधारणा करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे.

291
Lok Sabha Election 2024 : मतदारयादीतून वगळली 1.66 कोटी मतदारांची नावे
Lok Sabha Election 2024 : मतदारयादीतून वगळली 1.66 कोटी मतदारांची नावे

लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या वार्षिक फेरनिरीक्षणात निवडणूक आयोगाने मतदारयादीतून 1.66 कोटींहून अधिक नावे काढून टाकली आहेत. (Lok Sabha Election 2024) देशभरात 2.68 कोटीहून अधिक नवीन मतदार जोडले आहेत. सार्वत्रिक निवडणुकीत एकूण पात्र मतदारांची संख्या सुमारे 97 कोटी आहे. निवडणूक निरीक्षकांनी (Election Inspector) सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली.

(हेही वाचा – Best Cancer Hospital in Mumbai : मुंबईतील सर्वोत्तम कर्करोग रुग्णालये)

2 लाख नवीन मतदारांची नोंदणी

निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) प्रतिज्ञापत्रात वकील अमित शर्मा म्हणाले ती, “1 जानेवारी 2024 च्या संदर्भात मतदारयादीचे विशेष सारांश पुनरिक्षण (एसएसआर), पात्रता तारीख 8 फेब्रुवारी 2024 रोजी पूर्ण होत आहे. एसएसआरच्या या कालावधीत आजपर्यंत एकूण 2,68,86,109 नवीन मतदारांची मतदार यादीत नावनोंदणी करण्यात आली आहे आणि मृत, डुप्लिकेट आणि कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांच्या कारणास्तव 1,66,61,413 विद्यमान नोंदी हटवण्यात आल्या आहेत.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे नेतृत्व

देशातील आसाम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा ही सहा राज्ये वगळता संपूर्ण देशात या यादीत सुधारणा करण्यात आली. मतदार यादीतील (Electoral Roll) डुप्लिकेट नावे शोधून काढण्याची मागणी करणाऱ्या संविधान वाचवा ट्रस्टने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर (पीआयएल) सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयात 2 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने शपथपत्राद्वारे ही आकडेवारी शेअर केली होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपिठाने सोमवारी आयोगाला मृत मतदार, कायमचे स्थलांतरित झालेले आणि डुप्लिकेशनमुळे हटवलेले मतदार दर्शवणारा आकडा सादर करण्यास सांगितले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.