पुण्यातील (pune) लोणी (Ramdara Temple Pune) काळभोर येथील रामदरा मंदिर (Ramdara Temple) हे एक प्राचीन मंदिर आहे. महाराष्ट्रातील (maharshtra) भगवान शिवाचे हे प्राचीन मंदिर असून मंदिरातील श्री राम, लक्ष्मण आणि माता सीता यांच्या मूर्तींसाठी ते लोकप्रिय आहे. म्हणूनच ते “रामदरा” या नावाने ओळखले जाते.
मंदिराजवळ एक विहीर आहे. जिचा वापर श्रीराम आणि माता सीता यांनी त्यांच्या वनवासादरम्यान केला होता, असे मानले जाते. मंदिराला लागूनच श्री देवीपुरी महाराजांचा आश्रम आहे. ज्यांना धुंडी बाबा म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या पुनर्बांधणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ज्या भागात हे मंदिर बांधण्यात आले आहे, त्या भागाला स्थानिक लोक शतकानुशतके रामदरा म्हणून ओळखतात. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा रामदरा मंदिराला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो.
(हेही वाचा – Sanjay Raut यांचा अजब सल्ला; ‘आता Supreme Court नेही रस्त्यावर उतरले पाहिजे’ )
1954 मध्ये धुंडी बाबांच्या आगमनापूर्वी हे प्राचीन मंदिर नादुरुस्त अवस्थेत होते. त्यानंतर 1970 च्या दशकात, धुंडी बाबांनी प्राचीन अवशेषांजवळ सध्याच्या मंदिराचे बांधकाम सुरू केले. त्यांनी वास्तुशास्त्राच्या प्राचीन विज्ञानानुसार मंदिर बांधले आणि मंदिराजवळ एक तलावही बांधला. पावसाळ्यात या तलावात पाणी साचते. ७ वर्षे दररोज शेकडो गावकरी बाबाजींसमवेत जमून रामदरा या सुंदर मंदिराच्या बांधकामाला हातभार लावत असतं. जेणेकरून या मंदिरात येऊन सिया रामाचे दर्शन घेता येईल.
पार्किंग शुल्क…
या मंदिरात जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वत:चे वाहन. दोनचाकी किंवा चार चाकी वाहनाने या मंदिरात जाता येऊ शकते, कारण येथे जाण्यासाठी थेट बस नाही. याला पर्याय म्हणून एखादी गाडी भाड्याने घेऊ शकता. लोणी टोलनाका ओलांडल्यानंतर काही मिनिटांतच एक छोटासा पूल दिसतो. तो ओलांडल्यानंतर लगेच उजवे वळण घेऊन गावाकडे जा. त्यानंतर चौकातून उजवे वळण घेऊन ६-७ किलोमीटरचा प्रवास करून मंदिराकडे जाता येईल. दुचाकीसाठी पार्किंग शुल्क २० रुपये, तर चारचाकीसाठी ४० रुपये पार्किंग शुल्क आहे.
मंदिराची वेळ
सकाळी ९ वाजता मंदिर उघडते आणि सायंकाळी ५ वाजता हे मंदिर बंद होते.
खाण्याची ठिकाणे
पार्किंगजवळ २ रेस्टॉरंट्स आहेत. तिथे नाश्ता आणि दुपारचे जेवण घेता येईल.
फोटोग्राफी आणि व्हिडियोग्राफीसाठी उत्तम ठिकाण…
निसर्गसौंदर्य आणि हव्याहव्याशा वाटणाऱ्या शांततेचा अनुभव घ्यायचा असेल, तर पुणे स्थानकापासून 25 किमी आणि हडपसरपासून 18 किमी अंतरावर हे मंदिर आहे. डोंगरांनी वेढलेले असल्याने रामदरा मंदिर दुरून दिसत नाही. तलावावरील मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि त्याच्या प्रवेशद्वारावर एक मोठा नंदी आहे. मंदिरात भगवान श्रीराम, सीता माता आणि श्री लक्ष्मण तसेच श्री दत्तात्रेय या देवतांच्या सुंदर मूर्ती आहेत. मंदिरातील शिवलिंग धुंडीबाबांनी स्वत: कोरलेले आहे. मंदिरात पवित्र स्मृतिचिन्हेही आहेत. तिबेटमधील १२ ज्योतिर्लिंगही येथे आहेत. भिंतींवर विविध देवी, देवता, संत आणि शिल्पे यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मुख्य मंदिराशेजारी श्री देवीपुरी महाराजांचा आश्रम आहे. सुंदर तलाव, नारळ आणि ताडाच्या झाडांनी वेढलेले हे मंदिर आहे. तलावात कमळाची फुले आणि बदके आहेत. हे ठिकाण सुंदर आणि प्रसन्न असल्यामुळे येथे फोटोग्राफी आणि व्हिडियोग्राफीसाठी हे ठिकाण उत्तम आहे. मन:शांतीकरिता या ठिकाणाला अनेक जण आवर्जून भेट देतात.
हेही पहा –