Creative Academy : क्रिएटिव्ह अकॅडमीच्या नौशाद शेखकडून विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, अश्लील चॅट, मारहाण आणि बरेच काही

Creative Academy : क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये काही विद्यार्थिनींना बलपूर्वक बळजबरीने मारहाण केली जात असे. लेडीज हॉस्टेलमध्ये नौशाद शेख वास्तव्यास होता. तो रात्रभर तिथे रहायचा आणि काही विद्यार्थिनींना अश्लील चाट करणे, अश्लील संभाषण करणे अशी वागणूक देत असे.

1133
Creative Academy : क्रिएटिव्ह अकॅडमीच्या नौशाद शेखकडून विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, अश्लील चॅट, मारहाण आणि बरेच काही
Creative Academy : क्रिएटिव्ह अकॅडमीच्या नौशाद शेखकडून विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, अश्लील चॅट, मारहाण आणि बरेच काही

लोणावळ्यातील क्रिएटिव्ह अकॅडमीच्या (Creative Academy) नावाखाली नौशाद शेख (Naushad Sheikh) या धर्मांधाने विद्यार्थिंनींवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. एका विद्यार्थिनीने लैंगिक शोषण (Sexual assault) आणि अत्याचारांसंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांच्या तपासात मोठे सेक्स रॅकेट उघड झाले आहे. पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत.

अकॅडमीच्या विद्यार्थिनींना महिला पोलीस संपर्क करीत आहेत. ते विद्यार्थिनींचे समुपदेशन करत आहेत. याच्या माध्यमातून बरीच धक्कादायक माहिती आपल्यासमोर येत आहे. या प्रकरणांमध्ये अजून काही विद्यार्थिनींनी तक्रार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये किमान 13 ते 14 विद्यार्थिनी अडकलेल्या आहेत, अशी गंभीर बाब यातून उघड झाली आहे.

(हेही वाचा – Loksabha Election 2024 : व्हीव्हीपॅट स्लिपवर मतदानाची वेळ, दिनांक छापा; सर्वोच्च नायालयात याचिका)

धर्मांतर, वेश्या व्यवसाय चालू आहे का – पोलीस करणार तपास

तिथे शिकत असलेल्या विद्यार्थिनींचा माइंड वॉश करून त्यांना इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन (Conversion to Islam) करण्यास भाग पाडले जात होते का ? विद्यार्थिनींचा वेश्या व्यवसायासाठी काही उपयोग केला गेला आहे का ? त्यांचे अश्लील चित्रीकरण करून त्यांना ब्लॅकमेलिंग केले जात आहे का ? याचाही पोलीस तपास करत आहेत. यात काही प्रमाणात पोलीस प्रशासनाला यश आले आहे, असे दिसत आहे.

अश्लील संभाषण, मारहाण, बरेच काही

काही विद्यार्थिनींना बलपूर्वक बळजबरीने मारहाण केली जात असे. लेडीज हॉस्टेलमध्ये नौशाद शेख हा वास्तव्यास होता. तो रात्रभर तिथे रहायचा आणि काही विद्यार्थिनींना अश्लील चाट करणे, अश्लील संभाषण करणे अशी वागणूक त्याची विद्यार्थिनी सोबत होती, अशी प्रकरणे आता समोर येत आहेत. काही विद्यार्थिनींना भिंतीवर डोके आपटणे लाताबुक्याने मारहाण करणे, असे सुद्धा अनेक प्रकार आता समोर येत आहेत.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : मतदारयादीतून वगळली 1.66 कोटी मतदारांची नावे)

2014 मध्येही झाली होती तक्रार

2014 मध्येही असाच प्रकार उघड झाला होता. एका विद्यार्थिनीवर असाच प्रकार झाला होता. तिने याबाबतीत तक्रारही दाखल केली होती. तेव्हा क्रिएटिव्ह अकॅडमीच्या (Creative Academy) नौशाद शेख विरोधात आंदोलनही झाले होते. त्याला पोलीस कस्टडीसुद्धा मिळाली होती. 2014 नंतर 2024 मध्ये आता पुन्हा एकदा असा प्रकार समोर आला आहे, या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अतिशय योग्य रितीने संपूर्ण तपास आपल्या हाती घेतलेला आहे.

मुळात 2014 ते 2024 या कालावधीमध्ये एकही फिर्याद दाखल झाली नाही किंवा कोणतीही माहिती समोर आली नाही; परंतु पोलीस त्या दृष्टिकोनातून सुद्धा हा सर्व तपास करत आहेत. कदाचित या दहा वर्षांच्या कालखंडामध्ये अनेक विद्यार्थिनींसंदर्भात ही गंभीर बाब घडली असण्याची शक्यता आहे पोलीस त्या अनुषंगाने सुद्धा तपास करत आहेत. काही विशिष्ट बाबींकडे आपण लक्ष दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण पोलिसांना तपास करण्यास सांगितले आहे. (Creative Academy)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.