Neelam Gorhe : मुलींचा जन्मदर वाढीसाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी

उप सभापती डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, नाशिक विभागात कमी होणारा मुलींचा जन्मदर चिंतेचा विषय असून आदिवासी बहुल भागात मुलींचा जन्मदर समाधानकारक आहे. विभागातील १३ तालुक्यांमध्ये मुलींचा जन्मदर कमी असल्याचे निदर्शनास आले असून ज्या ज्या भागात अवैध मार्गाने सोनोग्राफी सेंटर चालविले जात असतील आशी ठिकाणे फोकस करून कार्यवाही करण्यात यावी.

214
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शाश्वत विकास उद्दिष्टांची आवश्यकता; Neelam Gorhe यांचे प्रतिपादन

नाशिक विभागातील काही भागात मुलींचा जन्मदर कमी असल्याचे निदर्शनास आले असून आशा भागात जनजागृती कार्यक्रम राबविण्यात यावे. तसेच मुलींचा जन्मदर वाढीसाठी महिला दक्षता समितीच्या माध्यमातून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी दिल्या. (Neelam Gorhe)

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्षात विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी आश्रमशाळांमधील संरक्षणाविषयी आढावा तसेच नाशिक विभागात मुलींचा कमी होणारा जन्मदर, महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजना व त्यांची अंमलबजावणी, समाज कल्याण विभागाच्या विविध योजना व त्यांच्या अंमलबजावणी, महिला दक्षता समितीच्या कामातील सुधारणा आदि विषयांचा आढावा घेण्यात आला. (Neelam Gorhe)

(हेही वाचा – Loksabha Election 2024 : व्हीव्हीपॅट स्लिपवर मतदानाची वेळ, दिनांक छापा; सर्वोच्च नायालयात याचिका)

अवैध गर्भपाताच्या प्रकरणांचा निकाल लवकर लागला पाहिजे – डॉ. गोऱ्हे

उप सभापती डॉ. गोऱ्हे (Neelam Gorhe) पुढे म्हणाल्या की, नाशिक विभागात कमी होणारा मुलींचा जन्मदर चिंतेचा विषय असून आदिवासी बहुल भागात मुलींचा जन्मदर समाधानकारक आहे. विभागातील १३ तालुक्यांमध्ये मुलींचा जन्मदर कमी असल्याचे निदर्शनास आले असून ज्या ज्या भागात अवैध मार्गाने सोनोग्राफी सेंटर चालविले जात असतील अशी ठिकाणे फोकस करून कार्यवाही करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील अवैध गर्भपाताच्या प्रकरणांचा निकाल लवकर लागला पाहिजे त्यासाठी वेळोवेळी आढावा घेण्यात यावा. विभागीय आयुक्तांनी याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा. जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असेही डॉ. गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी सांगितले. (Neelam Gorhe)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.