वर्धा-पुलगावदरम्यान समृद्धी महामार्गावर कारचा अपघात होऊन यात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात चॅनल ८० जवळ मंगळवारला (६ फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास झाला.
नागपूर (nagpur) येथील मानव उत्थान सेवा समितीच्या साध्वी नीरजाबाई (वय २७), साध्वी सोनाक्षीबाई (वय ५८), साध्वी तरीशाबाई (वय ७०), साध्वी चेनाबाई ( वय ४२) यांच्यासह पाच जण नागपूर येथून कार क्रमांक एमएच ४० – टीसी- डी १०६ ने पुणे येथे जात होते. दरम्यान चॅनल क्रमांक ८० जवळ वर्धा-पुलगावदरम्यान गाडीला अपघात झाला. यात एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. मृतदेह पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आला आहे.
(हेही वाचा – Matunga Car Parking : माटुंग्यातील त्या वाहनतळाची जागा बदलणार का? रुईयासह पोद्दार कॉलेजमधील विद्यार्थ्यांची होणार गैरसोय)
अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव सुमन रघुनाथ राजूरकर (वय ७६, रा. यवतमाळ) असे आहे. जखमींमध्ये मानव उत्थान सेवा समितीच्या साध्वी नीरजाबाई, साध्वी सोनाक्षीबाई, साध्वी तरीशाबाई, साध्वी चेनाबाई यांचा समावेश आहे. त्यांना प्रथम धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते. वाहनांचा वेग मर्यादेपेक्षा जास्त समृद्धी महामार्गावर आतापर्यंत झालेले अपघात हे रात्री व पहाटेच्या दरम्यान झालेले आहेत. अनेकदा या वेळेत चालकाला डुलकी येते. त्यात ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वाहनांचा वेग असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे होणारे अपघात हे अत्यंत भीषण असतात. समृद्धी महामार्गावर एवढ्या वेगाने जी वाहने चालविली जातात तीदेखील या वेगासाठी योग्य नसतात, असेही स्पष्ट झाले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community