Bus Accident : मुंबई-गोवा महामार्गावर विद्यार्थ्याच्या प्रसंगावधानाने टळली मोठी दुर्घटना

333
मुंबई-गोवा महामार्गावर विद्यार्थाच्या प्रसंगावधानाने एक मोठी बस दुर्घटना (Bus Accident) टळली आहे. त्यामळे बसमधून प्रवास करणाऱ्या १९ जणांचे प्राण वाचले आहेत. रत्नागिरीहून मुंबईकडे जाणाऱ्या बसने महाडजवळील सावित्री नदीवरील पुलाजवळ पेट घेतला. या आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक (Bus Accident) झाली.

रात्री पावणे दोनच्या सुमारास घडली घटना

सुदैवाने बसच्या टायरला आग लागली असताना बसमधून प्रवास करत असलेल्या एका विद्यार्थ्याने प्रसंगावधान दाखवल्याने बसमधून प्रवास करत असलेल्या १९ प्रवाशांसह एकूण २२ जणांचे प्राण वाचले. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली बस ही रत्नागिरीहून मुंबईकडे येत होती. या बसमधून १९ प्रवासी प्रवास करत होते. तर दोन ड्रायव्हर आणि एक क्लिनर असे मिळून २२ प्रवासी होते. ही बस महाडजवळ सावित्री नदीवर असलेल्या पुलजवळ आली असताना तिने पेट घेतला. रात्री पावणे दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बसचा टायर पेटत (Bus Accident) असत्याचे लक्षात येताच त्याने इतर प्रवाशांना त्याची कल्पना दिली आणि वेळीच सर्व प्रवासी बसमधून बाहेर पडले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आर्यन भाटकर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.