- ऋजुता लुकतुके
विशाखापट्टणम कसोटीत यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि शुभमन गिल (Shubman Gill) हे युवा खेळाडू भारतीय विजयाचे स्टार होते. तर तिथे दक्षिण आफ्रिकेत १९ वर्षांखालील विश्वचषक खेळताना भारतीय संघासाठी तारणहार ठरले ते कर्णधार उदय सहारन आणि सचिन धास. दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळताना भारतीय संघाला (Indian team) विजयासाठी २४५ धावांची गरज होती. पण, १२व्या षटकातच संघाची अवस्था ४ बाद ३२ अशी बिकट झाली होती. यात आधीचे सामने गाजवलेला मुशीर खानही ४ वरच बाद झाला होता. (U19 World Cup 2024)
पण, कर्णधार उदय सहारनने ८१ आणि सचिन धासने ९६ धावा करत भारतीय डाव नुसता सावरला नाही, तर संघाला विजयाच्या जवळ नेलं, दोघांनी पाचव्या गड्यासाठी १७१ धावांची भागिदारी केली. यात सचिन धास जास्त आक्रमक होता. त्याने ९५ चेंडूंत १ षटकार आणि ११ चौकार लगावले. हे दोघे बाद झाल्यानंतरही प्रियांशू मोलिया (५), अरावली अवनीश (११) आणि मुरुगन अभिषेक (०) झटपट बाद झाले. पण, अखेर राज लिंबानीने ४ चेंडूंत १३ धावा रत भारतीय नौका पार नेली. भारताने ७ चेंडू आणि २ गडी राखून विजय मिळवला. (U19 World Cup 2024)
१९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ (Indian team) गतविजेता आहे. आणि अंतिम फेरी गाठण्याची संघाची ही सलग पाचवी खेप आहे. (U19 World Cup 2024)
The #BoysInBlue are into the FINAL of the #U19WorldCup! 🥳
A thrilling 2⃣-wicket win over South Africa U-19 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/Ay8YmV8QDg#TeamIndia | #INDvSA pic.twitter.com/wMxe7gVAiL
— BCCI (@BCCI) February 6, 2024
(हेही वाचा – NCP : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मनसेने अजित पवारांच्या जुन्या भाषणाचा व्हिडीओ केला पोस्ट)
आता भारताची गाठ या संघाशी
आतापर्यंत या स्पर्धेत भारतीय संघ कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. या संघाविरुद्ध यंदाच्या स्पर्धेत २०० धावा करणारा दक्षिण आफ्रिका हा पहिला संघ. स्टिव्ह स्टोक (१९) आणि डेव्हिड टिगर शून्यावर बाद झाले. पण, २ बाद ४६ वरुन लुआन प्रिटोरिअस (७६) आणि रिचर्ड सेलेटस्वेन (६४) यांनी दक्षिण आफ्रिकेच्या डावाला आकार दिला. या शिवाय व्हाईटहेड, लेन्स आणि लस यांनी वीसच्या वर धावा करत संघाची धावसंख्या २५० च्या जवळ आणून ठेवली. भारतातर्फे राज लिंबानीने ३ बळी मिळवले. (U19 World Cup 2024)
स्पर्धेचा अंतिम सामना ११ फेब्रुवारीला होणार आहे. आणि भारताची गाठ ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील विजेत्या संघाशी पडेल. (U19 World Cup 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community