Hockey Player Accused of Rape : अर्जुन पुरस्कार विजेत्या वरुण कुमारवर बलात्काराचा आरोप

एका महिलेच्या तक्रारीनंतर बंगळुरू पोलिसांनी वरुण कुमारवर पॉक्सो लावला आहे. 

256
Varun Kumar Rape Allegation : हॉकीपटू वरुण कुमारवर राष्ट्रीय कोच फलटन काय म्हणाले?
  • ऋजुता लुकतुके

अर्जुन पुरस्कार विजेता आणि हॉकी संघातील बचाव फळीचा महत्त्वाचा खेळाडू वरुण कुमारवर (Varun Kumar) बंगळुरू पोलिसांनी बलात्काराच्या आरोपावरून कारवाई सुरू केली आहे. एका महिलेनं त्याच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी वरुणवर पॉक्सो कायद्या (POCSO Act) अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. (Hockey Player Accused of Rape)

तक्रारदार महिला २२ वर्षांची आहे. आणि तिने १७ वर्षांची असल्यापासून वरुणला ओळखत असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर लग्नाची मागणी घालत अल्पवयीन असतानाच वरुणने (Varun Kumar) आपल्यावर एकापेक्षा जास्त वेळा बलात्कार केल्याचा आरोप महिलेनं केला आहे. (Hockey Player Accused of Rape)

या महिलेशी ओळख झाली तेव्हा वरुण (Varun Kumar) बंगळुरूतील साई केंद्रात शिबिरात सहभागी झाला होता. त्यानंतर २०२१ मध्ये त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. आणि पंजाब पोलिसांत नोकरी करणाऱ्या वरुणला नुकतीच विभागीय निरीक्षक पदावर बढतीही मिळाली आहे. (Hockey Player Accused of Rape)

(हेही वाचा – U19 World Cup 2024 : भारताचा १९ वर्षांखालील संघ सलग पाचव्यांदा अंतिम फेरीत)

महिलेने वरुणवर केले हे आरोप 

‘एका महिलेच्या तक्रारीवरून आम्ही वरुण (Varun Kumar) विरोधात लैंगिक गुन्ह्यांविरोधात बालकांचे संरक्षण या कायद्याअन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. अल्पवयीन महिलेची फसवणूक व बलात्कार हे आरोप त्याच्या विरोधात आहेत,’ असं बंगळुरू पोलिसांच्या प्रवक्त्यांनी पीटीआयला सांगितलं आहे. (Hockey Player Accused of Rape)

वरुण (Varun Kumar) हा सध्या भारतीय संघाबरोबर भुवनेश्वर इथं सराव करत आहे. ‘वरुणने लग्नाचं वचन देऊन आपल्याला फसवलं. मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवायला लावले. आणि ५ वर्षांच्या संबंधांनंतर सोडून दिलं. तसंच जेव्हा दाद मागितली तेव्हा फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली,’ असा आरोप या महिलेनं केला आहे. (Hockey Player Accused of Rape)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.