- ऋजुता लुकतुके
जून महिन्यातील आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जुलै महिन्यात भारतीय संघ (Indian team) झिंबाब्वे (Zimbabwe) इथं ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. २९ जूनला विश्वचषक संपल्यानंतर लगेचच ६ जूनपासून ही मालिका सुरू होईल. त्यामुळे भारतीय संघातील (Indian team) ज्येष्ठ आणि नियमित खेळाडू या मालिकेत खेळणार नाहीत. त्याऐवजी नवीन खेळाडूंचा संघ झिंबाब्वेला (Zimbabwe) पाठवण्यात येईल, असं बीसीसीआयने (BCCI) स्पष्ट केलं आहे. हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर ६,७, १०, १३ आणि १४ जुलैला हे सामने होतील. (India Tour of Zimbabwe)
India Tour of Zimbabwe
🗓️ July 2024
5⃣ T20Is 🙌
📍 HarareMore details 👉 https://t.co/lmtzVUZNCq#TeamIndia | #ZIMvIND pic.twitter.com/CgVkLS8JIB
— BCCI (@BCCI) February 6, 2024
(हेही वाचा – Water Cut : राज्यावर पाणीटंचाईचे सावट; धरणांमध्ये केवळ ५५ टक्के पाणीसाठा)
६ ते १४ जुलै दरम्यान हरारेत ही मालिका होणार
झिंबाब्वे क्रिकेट आणि बीसीसीआय (BCCI) यांच्यातील प्रदीर्घ चर्चेनंतर या दौऱ्याचा कार्यक्रम ठरला आहे. झिंबाब्वेतील आताची राजकीय आणि क्रिकेटविषयक परिस्थिती पाहता, त्यांना इतर देशांबरोबर खेळायचा अनुभव मिळावा आणि ते लवकर क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात परतावेत, यासाठी या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ‘झिंबाब्वे (Zimbabwe) आणि झिंबाब्वे (Zimbabwe) क्रिकेट सध्या स्थित्यंतरातून जात आहे. अशावेळी त्यांना पुन्हा उभं राहण्याचं बळ देण्याच्या दृष्टीने भारताने पुढे केलेला हा सहकार्याचा हात आहे,’ असं बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह यांनी म्हटलं आहे. (India Tour of Zimbabwe)
झिंबाब्वेचे (Zimbabwe) इतर देशांबरोबरचे क्रिकेटचे संबंध पुन्हा प्रस्थापित व्हावेत यासाठी झिंबाब्वे क्रिकेटचे तेवेंगा मुकुलानी प्रयत्न करत आहेत. (India Tour of Zimbabwe)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community