- ऋजुता लुकतुके
देशात तांदळाच्या किमती किरकोळ बाजारत गेल्या वर्षभरात १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे महागाईवर उतारा म्हणून केंद्र सरकारने (Central Government) डाळ आणि गव्हानंतर आता तांदळाची विक्रीही अनुदानित दराने सुरू केली आहे. त्यासाठी भारत तांदूळ हा ब्रँड मंगळवारी लाँच करण्यात आला. (Bharat Rice)
हा तांदूळ ५ आणि १० किलोंच्या पिशव्यांमध्ये उपलब्ध असेल. अन्न व ग्राहक व्यवहारमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांच्या हस्ते या ब्रँडचं अनावरण करण्यात आलं. ‘सुरुवातीला सरकारने घाऊक बाजारपेठेत भावांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा फारसा उपयोग झालेला नाही, हे पाहता आता किरकोळ विक्रीमध्येच अनुदान देण्याचं धोरण ठेवलं आहे. त्यासाठी मध्यमवर्गीय आणि गरिबांना भारत या ब्रँड खाली गहू, तांदूळ आणि डाळी मिळणार आहेत,’ असं गोयल (Piyush Goyal) यावेळी बोलताना म्हणाले. (Bharat Rice)
Centre launches sale of Bharat Rice at an MRP of Rs. 29/kg in 5Kg and 10Kg packs
‘Bharat’ Rice available at physical and mobile outlets of Kendriya Bhandar, National Agricultural Cooperative Marketing Federation of India (@nafedindia) and National Cooperative Consumers’… pic.twitter.com/p0CjnZveIs
— PIB India (@PIB_India) February 6, 2024
(हेही वाचा – Paytm Crisis : पेटीएमचे संस्थापक अध्यक्ष विजय शेखर यांनी अर्थमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा)
या संस्थांना पुरवणार १ लाख टन तांदूळ
यापूर्वी टोमॅटो आणि कांद्याच्या किमती आटोक्यात आणण्यात सरकारला यश आलं असल्याचा दावा गोयल (Piyush Goyal) यांनी केला. देशातील अन्न सहकारी संस्था नाफेड (NAFED) तसंच केंद्रीय भांडार आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी फेडरेशन या संस्थांना १ लाख टन तांदूळ पुरवणार आहे. आणि हा तांदूळ ब्रँडिंग नंतर २९ रुपये किलो दराने रेशन दुकानं आणि केंद्रीय भांडारांमध्ये विकण्यात येईल. पहिल्या टप्प्यात देशभरात ५ लाख टन तांदळाची विक्री करण्याचं उद्दिष्टं आहे. (Bharat Rice)
भारत ब्रँडच्या शेती उत्पादनांच्या विक्रीसाठी खासकरून ग्रामीण भागात १८,००० विक्री केंद्र उभारण्यात येणार असल्याचंही गोयल (Piyush Goyal) यांनी स्पष्ट केलं. यापूर्वी या ब्रँड अंतर्गत केंद्र सरकारने (Central Government) भारत आटा २७.५ रुपये प्रति किलो दराने विकायला सुरुवात केली आहे. तर चणाडाळ ६० रुपये प्रतीकिलो दराने विकण्यात येत आहे. रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) या आधीच्या पतधोरणाच्या बैठकीत देशात किरकोळ महागाई दर पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. (Bharat Rice)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community