UPI Outage : तुमचं युपीआय खातं तुम्हाला सध्या त्रास देतंय का?

मंगळवारी संध्याकाळी काही बँका आणि युपीआय प्लॅटफॉर्मना सर्व्हरकडून साथ मिळत नसल्यामुळे युपीआय सेवेत अडथळे येत होते. 

236
UPI Outage : तुमचं युपीआय खातं तुम्हाला सध्या त्रास देतंय का?
UPI Outage : तुमचं युपीआय खातं तुम्हाला सध्या त्रास देतंय का?
  • ऋजुता लुकतुके

ऑनलाईन पेमेंट्स आणि खासकरून युपीआयवरून (UPI) पैसे हस्तांतरित करण्याची आता भारतीयांना सवय लागली आहे. पण, मंगळवारी संध्याकाळी ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांना अचानक आणि काही तास अडचणींचा सामना करावा लागत होता. बँकांचे सर्व्हर बंद पडल्यामुळे पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात जात नव्हते. गुगल पे, फोन पे तसंच भीम ॲप असा सगळ्या ॲपना ही समस्या जाणवत होती. (UPI Outage)

त्यामुळे काही वेळातच ट्विटर या सोशल मीडिया साईटवर त्यावरून जोरदार चर्चा झडली. शेवटी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं. त्यांनी ते दिलं ट्विटरवरच. ‘युपीआय (UPI) प्रणाली वापरताना काही लोकांना अडचणी येत आहेत. त्याबद्दल क्षमस्व. एनपीसीएची यंत्रणा सुरळीत सुरू आहे. पण, काही बँकांचे सर्व्हर बंद पडले असल्यामुळे त्या बँकेत खातं असलेल्या लोकांना अडचणी येत आहेत. लवकरच प्रणाली सुरळीत होईल, असा विश्वास आहे,’ एनपीसीएने आपल्या ट्विटर खात्यावर हा संदेश दिला. (UPI Outage)

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशनने कोणत्या बँकेचा सर्व्हर बंद होता याची माहिती या संदेशात दिली नाही. पण, लोकांनी सोशल मीडियावर बँकेचं नाव दिलं होतं. आणि थोड्या वेळाने बँकेनंही ट्विटरवर स्पष्टीकरण दिलं. सर्व्हर बंद झालेली बँक होती एचडीएफसी बँक. ज्या लोकांची युपीआय खाती एचडीएफसी बँकेतील खात्यांशी जोडलेली होती, त्यांना युपीआयच्या (UPI) माध्यमातून व्यवहार कठीण जात होते. (UPI Outage)

(हेही वाचा – Djokovic vs Nadal : सौदी अरेबियात नदाल विरुद्ध जोकोविच लढतीची ‘किंग्ज स्लॅम’)

‘युपीआय (UPI) ग्राहकांना काही अडचणी येत आहेत. पण, आम्ही ती समस्या सोडवत आहोत. आणि आता ती जवळ जवळ सुटली आहे,’ असं एचडीएफसी बँकेनं ट्विटरवरच स्पष्ट केलं. (UPI Outage)

लोकांनी एचडीएफसी बरोबरच कोटक महिंद्रा आणि एसबीआय बँकेतून पैसे ऑनलाईन हस्तांतरित होत नसल्याची तक्रार केली होती. एचडीएफसी बँकेचा सर्व्हर काही काळ डाऊन झाल्यामुळे कोणतेही ऑनलाईन व्यवहार काही काळासाठी होत नव्हते. (UPI Outage)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.