नेहरूंनी एकदा एक पत्र लिहिले होते. ते त्या काळातील देशाच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र आहे. मला कोणतेही आरक्षण, विशेषतः नोकरीतील आरक्षण आवडत नाही, असे या पत्रात म्हटले आहे. अकार्यक्षमतेला चालना देणाऱ्या आणि दुसऱ्या दर्जाकडे नेणाऱ्या कोणत्याही कृतीच्या मी विरोधात आहे, असे नेहरू (Jawaharlal Nehru) यांनी म्हटले होते. त्याचा मी अनुवाद वाचत आहे, अशा प्रकारे नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्यसभेत आरक्षणाविषयीची भूमिका स्पष्ट केली. (PM Modi)
(हेही वाचा – UPI Outage : तुमचं युपीआय खातं तुम्हाला सध्या त्रास देतंय का?)
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लोकसभेत (Lok Sabha) उत्तर दिले. त्या वेळी त्यांनी नेहरूंच्या भाषणाचे उल्लेख केला, तसेच कॉंग्रेसवर (Congress) सडकून टीकाही केली.
नेहरू आरक्षणाच्या विरोधात होते
पंतप्रधान पुढे म्हणाले की, “म्हणूनच मी म्हणतो नेहरू आरक्षणाच्या विरोधात होते. जर SC, ST, OBC यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळाले, तर सरकारी कामकाजाचा स्तर खाली येईल, असे नेहरू म्हणत असत. आज हे लोक ज्या आकड्यांची गणना करतात, त्यांचे मूळ येथे आहे.
पंतप्रधान मोदी यांनी 27 जून 1961 रोजी नेहरूंनी देशाच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला आहे. या पत्रात नेहरूंनी जातीच्या आधारावर नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचे समर्थन न करता मागास गटांना चांगले शिक्षण देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यावर भर दिला होता.
(हेही वाचा – Djokovic vs Nadal : सौदी अरेबियात नदाल विरुद्ध जोकोविच लढतीची ‘किंग्ज स्लॅम’)
काँग्रेसने ओबीसींना कधीही पूर्ण आरक्षण दिले नाही, त्यामुळे कॉंग्रेसने सामाजिक न्यायाचे ज्ञान देऊ नये. काँग्रेसने ओबीसींना कधीही पूर्ण आरक्षण (reservation in jobs) दिले नाही, सामान्य वर्गातील गरीबांना कधीही आरक्षण दिले नाही. त्यांनी कधीच बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्नला पात्र मानले नाही. आता हे लोक सामाजिक न्यायाचे धडे शिकवत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधानांनी कॉंग्रेसच्या धोरणांचा विरोध केला. (PM Modi)
हेही पहा –