Nitin Gadkari : रस्ते पायाभूत सुविधांचा विकास हा सांघिक भावनेचा परिणाम

खर्च कमी करणे आणि बांधकामाचा दर्जा वाढवणे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपण पर्यावरण, पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धनासाठी योगदान दिले पाहिजे. सर्व प्रयत्नांत यश मिळविण्यासाठी कामाचे वितरण आणि अधिकारांचे विकेंद्रीकरण आवश्यक असल्याचेही गडकरी म्हणाले.

277
Nitin Gadkari : उत्तर नागपूरचा सर्वांगीण विकास हेच ध्येय

रस्ते पायाभूत सुविधांचा विकास हा सांघिक भावनेचा परिणाम असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले. खर्च कमी करणे आणि बांधकामाचा दर्जा वाढवणे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपण पर्यावरण, पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धनासाठी योगदान दिले पाहिजे. सर्व प्रयत्नांत यश मिळविण्यासाठी कामाचे वितरण आणि अधिकारांचे विकेंद्रीकरण आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. (Nitin Gadkari)

“प्रकल्प व्यवस्थापन आणि रस्ता सुरक्षामधील उत्कृष्टता” या संकल्पनेवरील २०२२ राष्ट्रीय महामार्ग उत्कृष्टता पुरस्कार (NHEA)” वितरण समारंभाला त्यांनी मार्गदर्शन केले. रस्ते, बोगदे, पूल यांच्या बांधकामांमधे मिळवलेल्या अविश्वसनीय गती ही नागरिकांसाठी सन्मानाची बाब असल्याचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. (Nitin Gadkari)

(हेही वाचा – Sharad Pawar यांचा निवडणूक आयोगाला ई-मेल; पक्ष आणि चिन्हासाठी सुचवले तीन पर्याय)

ज्यूरींनी केलेल्या त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी राज्यमंत्री जनरल (निवृत्त) डॉ. व्ही. के. सिंग यांनी यावेळी त्यांचे आभार मानले आणि प्रतिष्ठित पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. देशातील रस्ते पायाभूत सुविधा मजबूत आणि वाढवण्याच्या उद्देशाने, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) २०१८ मध्ये “राष्ट्रीय महामार्ग उत्कृष्टता पुरस्कार (NHEA)” सुरू केले ज्यामुळे महामार्ग बांधकाम आणि देखभाल प्रक्रियेतील भागधारकांना प्रोत्साहन मिळून त्यांच्यात स्पर्धात्मकतेची भावना वाढीस लागते. यावेळी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), राष्ट्रीय महामार्ग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NHIDCL) या विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि इतर हितसंबंधी उपस्थित होते. (Nitin Gadkari)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.