पुणे : Dummy EVM Machine चोरी प्रकरणी ३ अधिकारी निलंबित, २ चोर अटकेत

भारत निवडणूक आयोगाने चोरी प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, सुरक्षा व्यवस्थेतील कमतरता विचारात घेऊन, पुणे जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, पुरंदर, तहसीलदार, पुरंदर तसेच संबंधित उपविभागीय पोलिस अधिकारी यांना तात्काळ निलंबीत करुन पुढील चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

318
एकाही राजकीय पक्षाची EVM Machine Hack बाबत लेखी तक्रार नाही

पुणे (Pune) जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात स्ट्राँग रूम (Srong Room) मधून डमी इव्हीएम मशीन चोरी झाल्याप्रकरणी तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले. (Dummy EVM Machine)

तीन अधिकारी निलंबित

भारत निवडणूक आयोगाने चोरी प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, सुरक्षा व्यवस्थेतील कमतरता विचारात घेऊन, पुणे जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, पुरंदर, तहसीलदार, पुरंदर तसेच संबंधित उपविभागीय पोलिस अधिकारी यांना तात्काळ निलंबीत करुन पुढील चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचे सुध्दा निर्देश देण्यात आलेले आहेत अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी बुधवारी दिली. (Dummy EVM Machine)

(हेही वाचा – Sant Rohidas Samaj Bhushan Award 2024 : अर्ज पाठविण्याचे महापालिकेचे आवाहन)

१० टक्के ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृतीसाठी

राज्यामध्ये १० डिसेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीत ईव्हीएम जनजागृती व प्रसिध्दीचा कार्यक्रम सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या प्रयोजनार्थ जिल्ह्यातील एकूण मतदानकेंद्रांच्या १० टक्के इतक्या संख्येत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट केवळ या कार्यक्रमासाठी जिल्हास्तरावरील मुख्य सरक्षा कक्षातून (Strong room) बाहेर काढण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये जनजागृती तसेच प्रसिध्दीसाठी वापरावयाच्या ईव्हीएम त्या मतदारसंघातील उपविभागीय अधिकारी यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी सुरक्षा कक्षात योग्य त्या सुरक्षेसह ठेवण्यात येतात. (Dummy EVM Machine)

स्ट्राँगरुमकरीता सुरक्षा व्यवस्था सासवड पोलिस ठाण्याकडून

दिवसभरात प्रचार प्रसिध्दी झाल्यानंतर त्या पुन्हा सुरक्षा कक्षात आणण्यात येतात. त्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशनकडून बंदोबस्त पुरविण्यात येतो. पुणे जिल्ह्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाकरीता उपविभागीय अधिकारी पुरंदर यांचे मुख्यालय सासवड येथे आहे. तेथील तहसील कार्यालयातील स्ट्रॉगरुममध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम जनजागृती कार्यक्रमासाठी वापरावयाच्या ४० ईव्हीएम (४० Ballot Unit, ४० Control Unit, ४० व्हीव्हीपॅट) ठेवण्यात आल्या आहेत. सदर स्ट्राँगरुमकरीता सासवड पोलिस स्टेशनकडून सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आलेली आहे. (Dummy EVM Machine)

(हेही वाचा – Supreme Court: आयएएस, आयपीएस अधिकारी आरक्षणाचा त्याग करणार का ? सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश गवईंनी चर्चेला तोंड फोडलं)

सुट्टीच्या दिवशी चोरी

जिल्हाधिकारी, पुणे तसेच पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या माहितीनुसार शनिवार किंवा रविवारी या ईव्हीएमपैकी एक Control Unit (BCUEL४१६०१) चोरीला गेल्याचे निदर्शनास आले होते. तसेच त्यासोबत कोरे पेपर रीम ५ व स्टेशनरी सुध्दा चोरीस गेलेली होती. (Dummy EVM Machine)

दोघांना अटक

दरम्यान पुणे जिल्हाधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालानुसार चोरीस गेलेले १ कंट्रोल युनिट पुणे ग्रामीण पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केले आहे व दोन संशयीत भय्या ऊर्फ शिवाजी रामदास बंडगर, वय २१ व अजिंक्य राजू साळुंखे, वय २१ रा. माळशिरस, जिल्हा पुणे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली असून, त्यांचेकडून १ कंट्रोल युनिट, ५ पेपर रीम आणि स्टेशनरी हस्तगत करण्यात आली आहे, असे देशपांडे म्हणाले. (Dummy EVM Machine)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.